Union Budget 2024: नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल; मुलींच्या योजनांसाठी निर्मला सीतारामण यांनी जाहीर केले 3 लाख कोटी

Woman Development Budget 2024-25 By FM Nirmala Sitharaman: आज सकाळी 2024-2025 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
Nirmala Sitharaman budget working woman development
Nirmala Sitharaman budget working woman development
Updated on

Women empowerment schemes in Union Budget 2024-25: आज सकाळी 2024-2025 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बजेट भाषणात मोठ्या घोषणा केल्या. तरुण, शेतकऱ्यांसह नोकरदार महिलांसाठी मोठा घोषणा करण्यात आली आहे.

नोकरदार महिलांसाठी मोठी घोषणा

नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल उभारण्यात येतील. अशा प्रकारच्या सुविधांमधून नोकरदार वर्गामध्ये महिलांची संख्या वाढण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल. सर्वांगीण विकासासाठी नॅशनल कोऑपरेशन पॉलिसी राबवली जाईल. याशिवाय देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल. असं यावेळी सीतारामन यांनी सांगितलं.

Nirmala Sitharaman budget working woman development
Budget 2024: एक कोटी तरुणांना टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप! मोदी सरकार आणणार महत्वाकांक्षी योजना

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारतर्फे भरीवर आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.