Budget 2024 Impact: अर्थसंकल्पानंतर अदानी-अंबानींना किती फायदा झाला? जाणून घ्या इतर अब्जाधीशांची अवस्था

Budget 2024 Impact Billionaires: सेन्सेक्सच्या लिस्टेड कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बजाज फिनसर्व्ह यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले. याचा फटका या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांनाच नाही तर त्यांच्या मालकांनाही बसला.
 Budget 2024
Budget 2024 Impact BillionairesSakal
Updated on

Budget 2024 Impact Billionaires: अर्थसंकल्पाच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता होती. याचा परिणाम भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीवरही झाला. सेन्सेक्सच्या लिस्टेड कंपन्यांमध्ये लार्सन अँड टुब्रो, बजाज फायनान्स, पॉवर ग्रिड, रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बजाज फिनसर्व्ह यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले. याचा फटका या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांनाच नाही तर त्यांच्या मालकांनाही बसला.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, मंगळवारी 10 अब्जाधीशांपैकी केवळ 3 जणांच्या संपत्तीत घट झाली. त्यापैकी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी सर्वाधिक तोट्यात होते. RIL च्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे त्यांची संपत्ती 1.10 बिलियन डॉलरने कमी होऊन 112 बिलियन डॉलर झाली आहे.

नुकसान झालेले दुसरे अब्जाधीश अजीम प्रेमजी आहेत. विप्रोच्या शेअर्सच्या घसरणीमुळे, त्यांची एकूण संपत्ती 123 दशलक्ष डॉलरने कमी होऊन 28.4 अब्ज डॉलर झाली आहे. तर कुमार बिर्ला यांनाही 200 दशलक्ष डॉलर्सचा धक्का बसला आहे. त्यांची एकूण संपत्ती आता 22.2 अब्ज डॉलर आहे.

 Budget 2024
Union Budget 2024 : गर्दीचा अन् सुविधांचा ओघ शहरांकडेच

'या' अब्जाधीशांची एकूण संपत्ती वाढली

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीत मंगळवारी 751 दशलक्ष डॉलरची वाढ झाली. आता त्यांची एकूण संपत्ती 102 अब्ज डॉलर झाली आहे.

शापूर मिस्त्री यांच्या संपत्तीत 219 दशलक्ष डॉलर्सची वाढ झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती आता 40.50 अब्ज डॉलर आहे. शिव नाडर यांच्या संपत्तीत 409 दशलक्ष डॉलरची वाढ झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती आता 37.2 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

 Budget 2024
Tata Group: निर्मला सीतारामन यांचा एक निर्णय अन् रतन टाटांनी केली 19 हजार कोटींची कमाई; नेमकं काय घडलं?

JSW स्टीलच्या मालक सावित्री जिंदाल यांच्या संपत्तीत 10.5 दशलक्ष डॉलरने वाढ झाली आहे. आता त्यांची एकूण संपत्ती 33.7 अब्ज डॉलर आहे. दिलीप सांघवी यांची एकूण संपत्ती 264 दशलक्ष डॉलरने वाढली आहे.

त्यांची एकूण संपत्ती 26.1 अब्ज डॉलर्स आहे. राधाकृष्णन दमानी यांनी मंगळवारी 234 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. त्यांची एकूण संपत्ती आता 24 अब्ज डॉलर आहे. सुनील मित्तल यांची संपत्ती 4 दशलक्ष डॉलरने वाढून 23.2 अब्ज डॉलर झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.