Union Budget 2024 : सर्वसमावेश व नावीन्यपूर्ण अर्थसंकल्प

आज लोकसभेत सादर करण्यात आलेला केवळ अंतरिम अर्थसंकल्प नसून या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारवरचा विश्वास व्यक्त झाला आहे.
Narendra Modi
Narendra ModiSakal
Updated on

नवी दिल्ली - आज लोकसभेत सादर करण्यात आलेला केवळ अंतरिम अर्थसंकल्प नसून या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारवरचा विश्वास व्यक्त झाला आहे. हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक व नावीन्यपूर्ण आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतरिम अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

या अर्थसंकल्पातून विकसित भारताचा पाया असलेला युवा, गरीब व शेतकरी या वर्गाला अधिक मजबूत करणारा ठरणार आहे. हा अर्थसंकल्प देशाचे भविष्य निर्माण करणारा आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत साकार करण्याचा पाया रचण्यासाठी या अर्थसंकल्पातून हमी मिळालेली आहे. युवकांच्या आकांक्षाचे पडसाद या अर्थसंकल्पात दिसून येत आहे. देशात संशोधनाला गती देण्यासाठी लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे स्टार्टअपसाठी करातून सवलत देण्याचा निर्णय दूरगामी परिणाम करणारा असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्यात यश आल्याचा दावा करून पंतप्रधान यांनी म्हटले आहे की, एकूण खर्चात ११ लाख ११ हजार कोटींनी वाढ झाली आहे. यामुळे अनेकांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. यातून २१ व्या शतकासाठी आवश्यक नव्या पायाभूत सुविधा निर्माण होण्यासही सहकार्य मिळणार आहे.

मोठे लक्ष्य साध्य झाल्यानंतर आम्ही त्यापेक्षाही मोठे लक्ष्य निश्चित केले आहे. या अर्थसंकल्पातून गरीब व मध्यमवर्गीयांच्या विकासासाठी अधिक वेगाने कार्य केले जाणार आहे. यातून चार कोटी लोकांना घरे बांधून दिली जाणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी ‘लखपती दीदी’ ही संकल्पना राबविली जात आहे. प्रारंभी केंद्र सरकारने दोन कोटी लखपती करण्याचे लक्ष्य ठेवले होते. ते आता तीन कोटींवर केले आहे. पंतप्रधानांनी ‘आयुष्मान भारत’ व ‘आशा वर्कर’साठी केलेल्या तरतुदींचा गौरवाने उल्लेख केला आहे.

अंतरिम अर्थसंकल्पात गरीब, कनिष्ठ मध्यमवर्ग आणि मध्यमवर्गीयांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. हा त्यांचा अर्थसंकल्प केवळ दैनंदिन व्यवहारांसाठी आहे. मी अर्थसंकल्प लक्षपूर्वक ऐकला, गरीब, निम्न मध्यमवर्ग आणि मध्यमवर्गीयांसाठी या अर्थसंकल्पात काहीही नमूद केलेले नाही. त्यांनी १० वर्षांत दिलेल्या आश्वासनांचा तपशील दिला नाही, किती आश्वासने दिली आणि किती पूर्ण झाली याची तुलना करायला हवी होती. तौलनिक विधान द्यायला हवे होते.

- मल्लिकार्जुन खर्गे, अध्यक्ष, काँग्रेस

आत्मनिर्भर व बलशाली भारताचा पाया घालणारा आणि विकसनशील भारत ते विकसित भारत अशी वाटचाल करणारा अर्थसंकल्प आहे. खऱ्या अर्थाने रोटी, कपडा व मकान या सुविधा जनतेला पुरवणारा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील दहा वर्षांच्या प्रयत्नांचे फलित असून देशाला महासत्ता बनवण्याच्या लक्ष्याकडे घेऊन जाणारा आहे. सर्वसमावेशक, सर्वसामान्यांना न्याय देणारा, महिला, तरुण, आबालवृद्ध, शेतकरी, कामगार या सर्वांचा विचार करणारा व त्यांना न्याय देणारा अर्थसंकल्प आहे.

- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

नवी उद्दिष्टे...

  • गरीब, महिला, युवा आणि ‘अन्नदाता'' (शेतकरी) या चार प्रमुख घटकांच्या विकासावर भर

  • पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (ग्रामीण) तीन कोटी घरांचे उद्दिष्ट

  • सौर ऊर्जा पॅनेलद्वारे एक कोटी कुटुंबांना दरमहा ३०० युनिट मोफत वीज

  • ‘डिजिटल इंडिया’अंतर्गत ‘यू-विन’ हे नवे व्यासपीठ सुरू करणार

  • आशासेविका, अंगणवाडी सेविकांचा ‘आयुष्मान भारत’मध्ये समावेश

  • संरक्षण उद्देशांसाठी सखोल तंत्रज्ञान (डीप टेक) मजबूत करण्यासाठी नवीन योजना

  • वाहतूक कार्यक्षमता सुधारण्यासाठी तीन प्रमुख रेल्वे मार्गिका योजना

  • अध्यात्मिक पर्यटनावर भर

  • २०१४ पूर्वीच्या आर्थिक स्थितीबाबत श्‍वेतपत्रिका काढणार

राष्ट्र-प्रथम’ या दृढविश्वासावर सरकार यशस्वी झाले. आपण २०१४ मध्ये कोठे होतो आणि आता कोठे आहोत, हे पाहाण्याची गरज आहे

- निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.