Budget 2024 : देख रहे हो शिंदेजी..! 'बजेट'मध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला विशेष काहीच नाही; राज्यातल्या खासदारांचं दिल्लीत आंदोलन

Union budget 2024-25 : मुंबईसाठी बजेटमध्ये विशेष काहीच दिलं नाही, महाराष्ट्रकडे दुर्लक्ष झाल्याचं स्पष्ट दिसून येतंय.. त्यामुळे खासदार आक्रमक झाले आहेत. अर्थसंकल्पानंतर महाविकास आघाडीच्या खासदारांचे संसदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरु झालं आहे. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आंदोलनात सहभागी झाले आहे.
Budget 2024
Budget 2024esakal
Updated on

Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. देशातील अनेक राज्यांसह बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष कुठलीही घोषणा केलेली नसल्याने संताप व्यक्त होतोय.

केंद्र सरकारने बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी ४० हजार कोटींची तरतूद केली. परंतु महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याताला विशेष काहीही निधी मिळालेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात विरोधक आक्रमक झालेले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बजेटवरुन दुजाभाव झाल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तिकडे दिल्लीमध्ये महाविकास आघाडीचे खासदार संतप्त झाले असून संसदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरु केलं आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राला जगातलं आर्थिक केंद्र करण्याचा संकल्प केला होता. मात्र अर्थसंकल्पात महाराष्ट्र आणि मुंबईच्या वाट्याला काहीही मिळालं नसल्याने खासदार आक्रमक झाले आहेत.

मुंबईसाठी बजेटमध्ये विशेष काहीच दिलं नाही, महाराष्ट्रकडे दुर्लक्ष झाल्याचं स्पष्ट दिसून येतंय.. त्यामुळे खासदार आक्रमक झाले आहेत. अर्थसंकल्पानंतर महाविकास आघाडीच्या खासदारांचे संसदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरु झालं आहे. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आंदोलनात सहभागी झाले आहे.

Budget 2024
Union Budget 2024: काय स्वस्त, काय महाग? निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्ते होणार नाराज, बजेटमध्ये काय आहे जाणून घ्या

महाविकास आघाडीच्या खासदारांनी मोदी सरकार हाय..हाय.. अशा घोषणा दिल्या. वर्षा गायकवाड, शोभा बाच्छाव, विशाल पाटील, बळवंत वानखेडे, प्रतिभा धानोरकर, प्रियंका चतुर्वेदी आदी खासदार यावेळी उपस्थित होते. जे राज्य केंद्रासोबत आहेत, त्यांना भरघोस मिळालं आणि जे विरोधात आहेत, त्यांच्यावर अन्याय झाला, असा विरोधी गटाचा आरोप आहे.

बिहारला काय मिळालं?

अर्थमंत्री सीतारामन यांनी बिहारला आर्थिक मदत जाहीर केली. बिहारच्या गयामध्ये आम्ही औद्योगिक विकासाला चालना देऊ, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. रस्ते जोडणी प्रकल्पांच्या विकासातही केंद्र सरकार सहकार्य करणार आहे. पाटणा-पूर्णिया द्रुतगती मार्ग, बक्सर-भागलपूर महामार्ग, बोधगया-राजगीर-वैशाली-दरभंगा आणि बक्सरमध्ये गंगा नदीवर अतिरिक्त द्विपदरी पूल बांधला जाणार आहे, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

याशिवाय बिहारमधील पीरपेंटी येथे नवीन 2400 मेगावॅट ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. बिहारमध्ये नवीन विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालये आणि क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. बहुपक्षीय विकास बँकांकडून बाह्य सहाय्यासाठी बिहार सरकारच्या विनंत्यांची विचार केला जाणार आहे.

आंध्र प्रदेशला काय मिळालं?

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशलाही मोठा भेट दिली आहे. पुनर्रचनेच्या वेळी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. आंध्र प्रदेशसाठी सुमारे 15 हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले जाणार आहे. निर्मला सीतारामन यांनी आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यात राज्याच्या भांडवलाची गरज मान्य केली आहे.

अर्थसंकल्पाचे अपडेट पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Budget 2024
Budget 2024 Session Updates : बजेटमध्ये महाराष्ट्रावर अन्याय झाला - सुप्रिया सुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.