Budget 2024: अर्थसंकल्प कधी सादर होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, अर्थमंत्र्यांच्या नावावर होणार ऐतिहासिक विक्रम

Union Budget 2024: देशात 18व्या लोकसभेच्या स्थापनेनंतर आता मोदी सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024 च्या तारखाही जाहीर झाल्या आहेत.
Union Budget
Union Budget 2024Sakal
Updated on

Union Budget 2024: देशात 18व्या लोकसभेच्या स्थापनेनंतर आता मोदी सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024 च्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन संपले आहे.

यामध्ये नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला आणि लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त बैठक झाली, ज्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संबोधित केले. आता सर्वांचे लक्ष अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लागले आहे. संसदेचे अधिवेशन 22 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांच्या X हँडलवर अर्थसंकल्पीय अधिवेशनाची माहिती दिली.

Union Budget
Veg Thali Price: सर्वसामान्यांना महागाईचा फटका; शाकाहारी थाळीच्या किमतीत 10 टक्क्यांनी वाढ, काय आहे कारण?
Union Budget
Reliance Jio IPO: देशातील सर्वात मोठा IPO लॉन्च करण्याच्या तयारीत अंबानी; जिओ मोडणार LICचा रेकॉर्ड

अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यांनी 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. सलग दुसऱ्यांदा केंद्रीय अर्थमंत्री म्हणून नियुक्त झालेल्या सीतारामन या सलग सात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या व्यक्ती ठरतील. सलग सहा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या मोरारजी देसाईंना त्या मागे टाकतील.

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर 24 जूनपासून संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. नवीन खासदारांनी शपथ घेतली आणि 27 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले.

करदात्यांना दिलासा मिळू शकतो

केंद्रीय अर्थसंकल्प 2024 च्या तारखा जाहीर झाल्यामुळे, मोदी 3.0 सरकारच्या अंतर्गत अर्थमंत्री करदात्यांसाठी काही मोठ्या घोषणा करतील अशी बरीच अपेक्षा आणि अटकळ बांधली जात आहे. दरम्यान, वृत्तसंस्था रॉयटर्सने दोन सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, केंद्र सरकार केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रामीण घरांसाठी राज्य अनुदान वाढवण्याची तयारी करत आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 50 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.