Budget Halwa Ceremony: अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत हलवा समारंभ संपन्न; पाहा VIDEO

Budget 2024 Halwa Ceremony: केंद्रीय अर्थसंकल्प 23 जुलै रोजी सादर होणार आहे. दरम्यान, आज मंगळवारी हलव्याचा सोहळा पूर्ण झाला आहे. प्रत्येक वेळी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी हा सोहळा आयोजित केला जातो. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री हलव्याने सर्वांचे तोंड गोड करतात.
halwa ceremony
halwa ceremony budgetSakal
Updated on

Union Budget 2024 Halwa Ceremony: केंद्रीय अर्थसंकल्प 23 जुलै रोजी सादर होणार आहे. दरम्यान, आज मंगळवारी हलवा समारंभ संपन्न झाला आहे. प्रत्येक वेळी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी हा सोहळा आयोजित केला जातो. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री हलव्याने सर्वांचे तोंड गोड करतात.

देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यास एक आठवडा शिल्लक आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग सातव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.

यापूर्वी, अर्थमंत्र्यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी दुसऱ्या टर्मसाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. 2024 चा अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात मंगळवारी अर्थ मंत्रालयात म्हणजेच नॉर्थ ब्लॉकमध्ये हलवा समारंभ आयोजित करण्यात आला होता.

मंगळवारी, केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत नॉर्थ ब्लॉकमध्ये हलवा समारंभ पार पडला. ‘लॉक-इन’ प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन, राज्यमंत्री पंकज चौधरी आणि सचिव उपस्थित होते. यावेळी अर्थसंकल्प तयारीत सहभागी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

halwa ceremony
Budget 2024: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना अर्थसंकल्पात मिळू शकते ‘गुड न्यूज’; करात दिलासा मिळणार का?

हलवा समारंभ म्हणजे काय?

दरवर्षी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी त्याचे आयोजन केले जाते. हलवा समारंभ ही नॉर्थ ब्लॉकमधील मोठ्या कढईत मिठाई तयार करण्याची प्रक्रिया आहे. अर्थमंत्री बजेट बनविण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्वांना हलवा देतात.

ही परंपरा अर्थ मंत्रालयातील सर्व अधिकाऱ्यांच्या मेहनतीची पावती देण्याचा एक मार्ग मानला जातो. हलवा समारंभ झाला की, आता बजेट तयार झाले असून सर्व कागदपत्रांच्या छपाईची प्रक्रिया सुरू होईल, असे मानले जाते.

जेव्हा हलवा समारंभ होतो, तेव्हा अर्थ मंत्रालयात लॉकडाऊनची सुरुवात मानली जाते. याचा अर्थ अर्थसंकल्पाशी संबंधित कोणत्याही अधिकाऱ्याला मंत्रालयाच्या आवारातून बाहेर पडू दिले जात नाही. संसदेत आर्थिक कागदपत्रे सादर केल्यानंतरच बजेट टीमच्या सर्व सदस्यांना बाहेर जाण्याची परवानगी दिली जाते.

halwa ceremony
RBI: आरबीआयचा कर्जदारांना दिलासा! नियमात केला मोठा बदल; बँकांना पाठवल्या सूचना

निर्मला सीतारामन नवीन विक्रम करणार

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैपासून सुरू होईल आणि वेळापत्रकानुसार 12 ऑगस्टला संपेल. या आगामी अर्थसंकल्पासह, सीतारामन माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी स्थापित केलेला विक्रम मोडतील.

ज्यांनी अर्थमंत्री म्हणून 1959 ते 1964 दरम्यान पाच वार्षिक बजेट आणि एक अंतरिम बजेट सादर केला होता. सीतारामन यांचे आगामी अर्थसंकल्पीय भाषण हे त्यांचे सहावे भाषण असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.