MSP Hike: शेतकऱ्यांची दिवाळी होणार दणक्यात! सरकारने गहू आणि मसूरसह 6 रब्बी पिकांवर वाढवला MSP

MSP Hike: दिवाळीपूर्वी सरकारने देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे.
Union Cabinet has approved Minimum Support Prices  for Rabi Crops for 2024-25
Union Cabinet has approved Minimum Support Prices for Rabi Crops for 2024-25 Sakal
Updated on

MSP Hike: दिवाळीपूर्वी सरकारने देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने 6 रब्बी पिकांसाठी एमएसपी म्हणजेच किमान आधारभूत किंमत वाढवली आहे. मंत्रिमंडळाने एमएसपी 2% वरून 7% पर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाला सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली.

गहू आणि मोहरीसह 6 पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गहू, बटाटा, हरभरा, मसूर, जवस, वाटाणा आणि मोहरी ही मुख्य रब्बी पिके मानली जातात. गव्हाची किमान आधारभूत किंमत 150 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. याशिवाय मोहरीची किमान आधारभूत किंमत 400 रुपये करण्यात आली आहे.

Union Cabinet has approved Minimum Support Prices  for Rabi Crops for 2024-25
Adani Group: गौतम अदानी आणखी एक कंपनी घेणार विकत? 'या' कंपनीशी चर्चा सुरु

या 6 रब्बी पिकांसाठी एमएसपी वाढवला आहे

  • मसूरच्या एमएसपीमध्ये 425 रुपये प्रति क्विंटल वाढ

  • गव्हाच्या एमएसपीमध्ये 150 रुपये प्रति क्विंटल वाढ

  • हरभऱ्यासाठी एमएसपी 105 रुपये प्रति क्विंटलने वाढला आहे

  • करडई पिकाच्या एमएसपीमध्ये 150 रुपये प्रति क्विंटल वाढ

  • बार्लीच्या एमएसपीमध्ये 115 रुपये प्रति क्विंटलने वाढ

  • तेलबिया आणि मोहरीच्या एमएसपीमध्ये 200 रुपये प्रति क्विंटल वाढ

Union Cabinet has approved Minimum Support Prices  for Rabi Crops for 2024-25
Dearness Allowance Hike: दिवाळीपूर्वी मोदी सरकारची आणखी एक भेट, महागाई भत्त्यात केली 4 टक्क्यांनी वाढ

एमएसपी काय आहे?

शेतकऱ्यांच्या हितासाठी एमएसपी प्रणाली लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत केंद्र सरकार पिकांची किमान किंमत ठरवते, त्याला MSP म्हणतात. या प्रणालीचा फायदा असा आहे की पिकांचे बाजारभाव जरी घसरले तरी केंद्र सरकार या एमएसपीवर शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी करते.

एमएसपीचा उद्देश शेतकऱ्यांना नुकसानीपासून वाचवणे हा आहे. सर्वप्रथम, MSP गव्हावर सुरू करण्यात आला जेणेकरून सरकार शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करू शकेल आणि आपल्या PDS योजनेंतर्गत गरीबांना वितरित करू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.