Air India: रतन टाटांच्या एअर इंडिया एक्सप्रेसला कामगार मंत्रालयाने पाठवली नोटीस, काय आहे प्रकरण?

Air India: केंद्रीय कामगार मंत्रालयाने टाटा समूहाच्या एअर इंडिया एक्सप्रेसला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे
Union labour ministry issues show cause notice to Air India Express
Union labour ministry issues show cause notice to Air India Express Esakal
Updated on

Air India: केंद्रीय कामगार मंत्रालयाने टाटा समूहाच्या एअर इंडिया एक्सप्रेसला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. एअरलाइन्स व्यवस्थापन आणि केबिन क्रू सदस्यांमधील काही वादांच्या संदर्भात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

अनेक केबिन क्रू मेंबर्सनी प्रवासापूर्वीच्या विश्रांतीच्या काळात रूम शेअरिंगबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय इतरही अनेक मुद्दे आहेत.

कामगार विभागात तक्रार करण्यात आली

याप्रकरणी औद्योगिक विवाद निवारण कायदा 1947 अंतर्गत कामगार विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी एअर इंडिया एक्स्प्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने टाटा समूहाच्या मालकीच्या एअरलाइन कंपनी एअर इंडियाला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर विमान कंपनीला कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली होती. प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांच्या निकषांचे उल्लंघन केल्यामुळे ही नोटीस आणि दंड ठोठावण्यात आला आहे.

Union labour ministry issues show cause notice to Air India Express
Gold Rate Today: खरेदीदारांना झटका! लग्नसराईत सोन्याच्या भावात वाढ, काय आहे आजचा भाव?

प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन, DGCA मे 2023 पासून अनेक प्रमुख विमानतळांना भेट देऊन विमान कंपन्यांची तपासणी करत आहे. विमान कंपन्यांनी कोणत्याही प्रकारे चुका लपविण्याचा प्रयत्न करू नये यासाठी कोणतीही माहिती न देता ही तपासणी करण्यात येत आहे.

Union labour ministry issues show cause notice to Air India Express
Share Market Opening: शेअर बाजारात निवडणुकीचा जल्लोष; निफ्टी पहिल्यांदाच 20500 च्या पुढे; अदानी शेअर्समध्ये मोठी वाढ

गेल्या महिन्यात, एअर इंडिया (Air India) एक्सप्रेस एम्प्लॉईज युनियन (AIXEU) ने नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना विमान कंपनीच्या केबिन क्रू सदस्यांनी तक्रारींबाबत पत्र लिहिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.