Zen Technologies : झेन टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये अपर सर्किट, AI रोबोट् आणि चार डिफेंस प्रोडक्ट्स लाँच केल्यामुळे दमदार तेजी

Zen Technologies Latest News In Marathi |कंपनीने एआय रोबोट आणि चार डिफेन्स प्रोडक्ट्स लॉन्च केले आहेत. या बातमीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली.
Upper circuit in shares of Zen Technologies AI robot and launch of four defense products boosts momentum
Upper circuit in shares of Zen Technologies AI robot and launch of four defense products boosts momentumSakal
Updated on

झेन टेक्नॉलॉजीजचे (Zen Technologies) शेअर्समध्ये सध्या चांगली तेजी दिसून येत आहे. शेअर्सना सोमवारी 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. सध्या हा शेअर बीएसईवर 1362 रुपयांवर ट्रेड करत आहे.

कंपनीने एआय रोबोट आणि चार डिफेन्स प्रोडक्ट्स लॉन्च केले आहेत. या बातमीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. या वाढीसह, कंपनीचे मार्केट कॅप 11,446.83 कोटी झाले आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1487 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांक 573.95 रुपये आहे.

झेन टेक्नॉलॉजीज त्याच्या उपकंपनी AI ट्युरिंग टेक्नॉलॉजीजच्या सहकार्याने जागतिक सुरक्षेसाठी नवीन IP-मालकीची डिफेन्स प्रोडक्ट्स लाँच केले. या प्रोडक्ट्समध्ये Hawkeye, Barbaric-URCWS (अल्ट्रालाइट रिमोट कंट्रोल वेपन स्टेशन), Prahasta आणि Steyr Stab 640 यांचा समावेश आहे. या सर्व डिफेन्स प्रोडक्ट्सचे कार्य काय आहे ते जाणून घेऊया.

Hawkeye : ही एक ऍडवान्स अँटी-ड्रोन सिस्टम कॅमेरा आहे ज्यामध्ये एकाधिक सेन्सर मॉड्यूल आहेत, सर्व हवामान परिस्थितीत 15 किमी पर्यंत ड्रोन ट्रॅक करण्यास सक्षम आहेत, जे सतत धोके शोधू शकतात आणि सुरक्षा वाढवू शकतात.

BARBARIK - URCWS : हे जगातील सर्वात हलके रिमोट-कंट्रोल वेपन स्टेशन आहे. हे जमिनीवरील वाहने आणि नौदलाच्या जहाजांना अचूक टारगेटिंग क्षमता प्रदान करते. हे बॅटलफील्ड इफेक्टिवनेस ऑप्टिमाइज करते आणि ऑपरेशनल रिस्क कमी करते.

Prahasta : हे LIDAR आणिरी-इनफोर्समेंट लर्निंग टेक्नोलॉजीने सुसज्ज असलेले ऑटोमॅटिक डिफेन्स प्रॉडक्ट आहे. हे मिशन प्लानिंग, नेव्हिगेशन आणि थ्रेट असेसमेंट करण्यासाठी रिअल-टाइम 3D मॅपिंग प्रदान करते. हे विविध प्रकारच्या कॅलिबर व्हेपन्सना सपोर्ट देते आणि फ्रंटलाइन डिफेन्स ऑपरेशन्ससाठी एक वर्सटाइल टूल आहे.

STHIR STAB 640 : हे armoured व्हीकल बोट्स आणि ICVS साठी डिझाइन केलेले आहे. STHIR STAB 640 मध्ये फायबर ऑप्टिक गायरो टेक्नोलॉजीचा वापर करून ऍडवांस स्टेबलाइज्ड साइट सिस्टम आहे. हे ऑटोमॅटिक सर्च आणि ट्रॅकिंग क्षमतेसह सिचुएशनल अवेअरनेस वाढवते. हे वेपन 12.7 मिमी ते 30 मिमी पर्यंत वेपन सिस्टमची मोठी रेंजला सपोर्ट करतात.

या प्रॉ़डक्ट्सच्या लॉन्चमुळे ऍडवांस रोबोटिक्सला कॉम्बॅट आणि शोध मोहिमा इंटीग्रेट करण्याच्या गरजेबद्दल जागरूकता वाढेल असे झेन टेक्नॉलॉजीजचे व्यवस्थापकीय संचालक अशोक अटलुरी म्हणाले.

गेल्या एका महिन्यात या स्टॉकने 11 टक्के परतावा दिला आहे.गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 78 टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. या वर्षी आतापर्यंत हा शेअर 72 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या एका वर्षात त्याच्या गुंतवणूकदारांनी 123 टक्के इतका मोठा नफा कमावला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.