US Corporate Bankruptcy: जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेली अमेरिका आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशातील हजारो लहान-मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत. वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांतच देशातील 452 मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत. गेल्या 14 वर्षांत दिवाळखोरीत गेलेल्या कंपन्यांची संख्या या वर्षी सर्वाधिक आहे.
2020 मध्ये जेव्हा कोरोनाने थैमान घातले तेव्हा लॉकडाऊनमुळे वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत म्हणजे ऑगस्टपर्यंत 466 कंपन्या दिवाळखोर झाल्या. यावर्षी ऑगस्टमध्ये 63 कंपन्या दिवाळखोर झाल्या तर जुलैमध्ये 49 कंपन्या दिवाळखोर झाल्या.