TCS Penalty: टीसीएस कंपनीला मोठा झटका! अमेरिकन न्यायालयाने ठोठावला 1,622 कोटींचा दंड, काय आहे प्रकरण?

TCS Penalty: भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS ला अमेरिकेत मोठा झटका बसला आहे. अमेरिकेतील एका न्यायालयाने टाटा समूहाच्या आयटी कंपनीला अब्जावधी डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. कंपनीनेच ही माहिती दिली.
US Court Orders TCS
US Court Orders TCSSakal
Updated on

TCS Penalty: भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS ला अमेरिकेत मोठा झटका बसला आहे. अमेरिकेतील एका न्यायालयाने टाटा समूहाच्या आयटी कंपनीला अब्जावधी डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. कंपनीनेच ही माहिती दिली.

TCS ने शुक्रवारी सांगितले की, टेक्सासच्या नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट, डॅलस डिव्हिजनच्या युनायटेड स्टेट्स डिस्ट्रिक्ट कोर्टाने कंपनीला 194 दशलक्ष डॉलर पेक्षा जास्त दंड ठोठावला आहे. व्यापार गुपितांचा (Trade secret) गैरवापर केल्याच्या आरोपामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. टीसीएसवर कॉम्प्युटर सायन्स कॉर्पोरेशनने (सीएससी) व्यापार गुपितांचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता.

TCS ने शेअर बाजारांना दिलेल्या माहितीनुसार, त्यावर लावण्यात आलेला दंड 194.2 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त आहे, ज्यामध्ये 561.5 दशलक्ष डॉलर नुकसान भरपाई आणि 25.8 दशलक्ष डॉलर व्याज यांचा समावेश आहे. भारतीय चलनात दंडाची एकूण रक्कम अंदाजे 1,622 कोटी रुपये आहे.

US Court Orders TCS
Union Budget 2024: मोदी सरकारच्या नव्या अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रावर असेल भर? सर्वसामान्यांना फायदा होणार का?

भारतीय आयटी कंपनीचे म्हणणे आहे की त्यांच्याकडे न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याचे कारण आहे. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला वरच्या न्यायालयात आव्हान देऊन पुनर्विलोकन याचिका दाखल करणार असल्याचे टीसीएसने म्हटले आहे. TCS ने म्हटले आहे की त्यांना 14 जून 2024 रोजी न्यायालयाचा संबंधित आदेश प्राप्त झाला आहे.

US Court Orders TCS
RBI Penalty: रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई; सरकारी बँकेला ठोठावला कोट्यवधी रुपयांचा दंड, तुमच्या पैशांचे काय होणार?

टीसीएसला वाटते की मोठा दंड ठोठावण्याच्या न्यायालयाच्या या निर्णयामुळे कोणताही आर्थिक परिणाम होणार नाही. कंपनी आपल्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि न्यायालयाच्या या आदेशामुळे उद्भवणाऱ्या कायदेशीर आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची तयारी करत आहे. टीसीएसला आशा आहे की पुनर्विलोकन याचिका आणि आव्हानानंतर निर्णय आपल्या बाजूने येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.