US Fed Rate Cut: फेड रिझर्व्हने व्याजदरात केली कपात; भारतीय शेअर बाजार, RBI आणि सोन्याच्या किमतींवर काय परिणाम होणार?

US Fed Rate Cut: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर व्याजदरात कपात केली आहे. फेडने 50 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. यानंतर अमेरिकेतील व्याजदर 4.75% ते 5% च्या दरम्यान आहेत.
US Fed Rate Cut
US Fed Rate CutSakal
Updated on

US Fed Rate Cut: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर व्याजदरात कपात केली आहे. फेडने 50 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. यानंतर अमेरिकेतील व्याजदर 4.75% ते 5% च्या दरम्यान आहेत. फेडरल ओपन मार्केट कमिटी (FOMC) च्या दोन दिवसीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीनंतर यूएस फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल म्हणाले की, अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि महागाई खाली आली आहे. फेडच्या 12 पैकी 11 सदस्यांनी व्याजदर कपातीच्या बाजूने मतदान केले.

FOMC बैठकीनंतर पत्रकारांना संबोधित करताना जेरोम पॉवेल म्हणाले की, अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत आहे. कामगार बाजार पूर्वीच्या स्थितीतून सामान्य झाला आहे. ऑगस्टमध्ये महागाईचा दर 7 टक्क्यांवरून 2.2 टक्क्यांवर आला आहे.

ते म्हणाले की, आता महागाईचा धोकाही बराच कमी झाला आहे. फेडने शेवटची व्याजदर कपात मार्च 2020 मध्ये केली होती. अमेरिकेत महिनाभरानंतर होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी फेडने जनतेला दिलेला हा मोठा दिलासा आहे.

US Fed Rate Cut
Tupperware Bankruptcy: आईचं लाडकं टप्परवेअर आलं अडचणीत? दिवाळखोरी केली जाहीर, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

आरबीआयवर दबाव वाढला आहे

फेडच्या निर्णयानंतर देशांतर्गत बाजारात व्याजदर कपात किती होते हे पाहणे बाकी आहे. फेडने व्याजदरात कपात केल्यामुळे आरबीआयवर दबाव वाढणार आहे. देशांतर्गत बाजारात किरकोळ आणि घाऊक महागाई दरात घट दिसून येत आहे. त्याचा परिणाम ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या एमपीसीमध्ये पॉलिसी रेट कमी करण्याच्या स्वरूपात दिसून येईल.

अनेक दिवसांपासून बाजारात याची मागणी होत आहे. पण काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आरबीआय याबाबत घाई करणार नाही आणि डिसेंबरमध्ये होणाऱ्या एमपीसीमध्ये व्याजदर कमी होण्याची अपेक्षा आहे. यानंतर सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदर कमी होऊ शकतात.

US Fed Rate Cut
Nitin Gadkari: 'आम्ही तुम्हाला सोडणार नाही, बँक गॅरंटी जप्त करू अन् ब्लॅक लिस्टमध्ये टाकू'; नितीन गडकरी कुणावर चिडले?

तुमच्यावर काय परिणाम होईल?

फेडच्या निर्णयाचा परिणाम भारतीय बाजारावर होणार आहे. तज्ज्ञांचे मत आहे की शेअर बाजार आणि सोन्याच्या भावात वाढ दिसून येईल. त्याचबरोबर डॉलरवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे रुपया मजबूत होऊ शकतो.

अशा स्थितीत फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचा निर्यात करणाऱ्या कंपन्यांवर नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येते. फार्मा ते आयटी क्षेत्रातील कंपन्यांवर लक्ष ठेवावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.