वेदांताने QIP च्या माध्यमातून उभारले 8,500 कोटी रुपये...

वेदांत लिमिटेडने क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट अर्थात QIP अंतर्गत शेअर्सच्या विक्रीद्वारे 8,500 कोटी उभे केले आहेत. वेदांताने एका एक्सचेंज फायलिंगमध्ये ही माहिती दिली.
Vedanta raises Rs 8500 crore through QIP
Vedanta raises Rs 8500 crore through QIPSakal
Updated on

वेदांत लिमिटेडने क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट अर्थात QIP अंतर्गत शेअर्सच्या विक्रीद्वारे 8,500 कोटी उभे केले आहेत. वेदांताने एका एक्सचेंज फायलिंगमध्ये ही माहिती दिली. कंपनीने QIP अंतर्गत 19.31 कोटी शेअर्स 440 रुपये प्रति इक्विटी शेअरच्या हिशोबाने विकले आहेत, जे 461.26 कोटीच्या QIP फ्लोअर किंमतीपेक्षा 4.61% डिस्काउंटवर आहे.

ज्या संस्थात्मक गुंतवणूकदारांना शेअर्स जारी करण्यात आले आहेत ते अद्याप उघड करण्यात आलेले नाहीत. वेदांताने 6,688 कोटी उभारण्यासाठी QIP लाँच केला होते. कंपनीने नंतर QIP ची साईज 1.02 अब्ज डॉलरपर्यंत वाढवली आणि 8,500 कोटीची संपूर्ण रक्कम उभारली, ज्यासाठी तिला शेअरहोल्डर्सकडून मंजुरी मिळाली होती.

वेदांताच्या प्रमोटर्सनी गेल्या महिन्यात ब्लॉक डीलद्वारे कंपनीतील 2.6% पर्यंत हिस्सा विकण्यास मान्यता दिली होती. त्यावेळी कंपनीतील प्रमोटर्सची हिस्सेदारी 61.95 टक्के होती. वेदांताचा शेअर 19 जुलैला 2.3% च्या घसरणीसह 441 रुपयांवर बंद झाला. कंपनीची इश्यू किंमत 19 जुलैच्या बंद किंमतीवर आधारित आहे. या वर्षी कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 80% वाढ पाहायला मिळाली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.