Thali Rate: कांदा आणि टोमॅटोचे भाव घसरले; शाकाहारी आणि मांसाहारी थाळी झाली स्वस्त

Thali Rate Reduced in December: कांदा आणि टोमॅटोच्या किंमती घसरल्यानंतर शाकाहारी थाळीच्या किंमतीत तीन टक्क्यांनी घट झाली आहे तर डिसेंबरमध्ये मांसाहारी थाळीच्या किंमतीत पाच टक्क्यांनी घट झाली आहे. सोमवारी एका अहवालात ही माहिती देण्यात आली.
Veg, Non-Veg Meal Costs Decline In December On Fall In Onion, Tomato Prices
Veg, Non-Veg Meal Costs Decline In December On Fall In Onion, Tomato Prices Sakal
Updated on

Thali Rate Reduced in December: कांदा आणि टोमॅटोच्या किंमती घसरल्यानंतर शाकाहारी थाळीच्या किंमतीत तीन टक्क्यांची घसरण झाली आहे तर डिसेंबरमध्ये मांसाहारी थाळीच्या किंमतीत पाच टक्क्यांची घसरण झाली आहे. सोमवारी एका अहवालात ही माहिती देण्यात आली.

CRISIL मार्केट इंटेलिजन्स अँड अॅनालिटिक्स (MI&A) रिसर्चच्या 'राइस रोटी रेट' अहवालानुसार, घरगुती शाकाहारी आणि मांसाहारी थाळीचे दर डिसेंबरमध्ये अनुक्रमे तीन टक्के आणि पाच टक्क्यांनी घसरले. शाकाहारी आणि मांसाहारी थाळीच्या दरात घसरण होण्याचे कारण म्हणजे कांदा आणि टोमॅटोच्या किंमतीतील झालेली घसरण.

डिसेंबरमध्ये कांद्याचे भाव 14 टक्क्यांनी तर टोमॅटोचे दर 3 टक्क्यांनी घसरले

डिसेंबरमध्ये मासिक आधारावर कांद्याचे भाव 14 टक्के आणि टोमॅटोचे दर तीन टक्क्यांनी घसरले आहेत. सणासुदीचा हंगाम संपल्याने घरातील स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या या भाज्यांचे दर कमी झाले आहेत.

Veg, Non-Veg Meal Costs Decline In December On Fall In Onion, Tomato Prices
Budget 2024: शेतकऱ्यांसाठी सरकार करणार मोठी घोषणा; पीएम किसान योजनेचे पैसे वाढवण्याची शक्यता

मासिक आधारावर ब्रॉयलरच्या किंमतीत पाच-सात टक्के घट झाल्यामुळे मांसाहारी थाळीची किंमत कमी झाल्याचे अहवालात म्हटले आहे. मांसाहारी थाळीच्या खर्चात ब्रॉयलरचा वाटा 50 टक्के आहे.

घरच्या घरी थाळी तयार करण्याचा सरासरी खर्च उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भारतातील थाळी तयार करण्याच्या किंमतींच्या आधारे काढला जातो. धान्य, कडधान्ये, ब्रॉयलर, भाजीपाला, मसाले, खाद्यतेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतींनुसार थाळीच्या किंमतीत बदल होत असल्याचेही आकडेवारीवरून दिसून येते.

Veg, Non-Veg Meal Costs Decline In December On Fall In Onion, Tomato Prices
म्युच्युअल फंडांची AUM प्रथमच 50 लाख कोटी पार, SIP गुंतवणूक देखील 17,610 कोटींच्या विक्रमी उच्चांकावर

शाकाहारी थाळीच्या किंमतीत वार्षिक 12% वाढ

अहवालात पुढे म्हटले आहे की, शाकाहारी थाळीच्या किंमतीत वार्षिक आधारावर 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर मांसाहारी थाळीच्या किंमतीत चार टक्क्यांनी घट झाली आहे.

कांदा आणि टोमॅटोच्या किंमतीत अनुक्रमे 82 आणि 42 टक्के वाढ हे शाकाहारी खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ होण्याचे मुख्य कारण असल्याचे अहवालात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.