Veg Thali: सर्वसामान्यांना मोठा झटका! नोव्हेंबरमध्ये व्हेज थाळी 10 टक्क्यांनी झाली महाग, काय आहे कारण?

Veg Thali Inflation: नोव्हेंबरमध्ये व्हेज थाळीच्या किंंमतीत वाढ झाली आहे.
Veg, Non-Veg thali got costlier in November amid soaring onion, tomato prices
Veg, Non-Veg thali got costlier in November amid soaring onion, tomato prices Sakal
Updated on

Veg Thali Inflation: नोव्हेंबरमध्ये व्हेज थाळीच्या किंंमतीत वाढ झाली आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या मते, अनियमित पावसामुळे खरीप हंगामात कमी उत्पादन आणि सणासुदीच्या हंगामात जास्त मागणी यामुळे भारतात व्हेज थाळीची किंमत ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये 10 टक्क्यांनी वाढली. मांसाहारी थाळीच्या किंमतीतही दर महिन्याला 5 टक्क्यांची वाढ झाली आहे.

कांदा आणि टोमॅटोचे भाव वाढल्याने व्हेज थाळी महागली

रोटी राइस रेट इंडेक्समध्ये, क्रिसिलने सांगितले की, व्हेज थाळीच्य किंमतीत झालेली वाढ ही कांद्याच्या किंमतीत 58 टक्के आणि टोमॅटोच्या किंमतीत 35 टक्के वाढ झाल्यामुळे झाली आहे. डाळींच्या किंमतीतही वार्षिक 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. थाळीच्या किंमतीत 9 टक्के वाटा डाळी आणि भाज्यांचा आहे.

Veg, Non-Veg thali got costlier in November amid soaring onion, tomato prices
LIC: एलआयसी जगातील चौथी सर्वात मोठी विमा कंपनी, पहिल्या क्रमांकावर कोण?

व्हेज थाळीमध्ये सामान्यतः रोटी, भाज्या (कांदे, टोमॅटो आणि बटाटे), तांदूळ, डाळ, दही आणि कोशिंबीर यांचा समावेश होतो. CRISIL उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भारतातील किंमतींच्या आधारे थाळी तयार करण्याचा सरासरी खर्च काढते.

मांसाहारी थाळीच्या किंमतीत 5 टक्क्यांनी वाढ

मांसाहारी थाळीच्या किंमतीत दर महिन्याला 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. टोमॅटोच्या किंमतीत घट झाल्यामुळे सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळींच्या किंमती 1 टक्के आणि 3 टक्क्यांनी घसरण झाली होती.

Veg, Non-Veg thali got costlier in November amid soaring onion, tomato prices
Cyber Crime: सरकारची मोठी कारवाई! गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या 100हून अधिक साइटवर घातली बंदी

डाळी आणखी महाग होऊ शकतात

इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनचे अध्यक्ष बिमल कोठारी म्हणाले की, भारतातील डाळीची एकूण वार्षिक गरज 45 लाख मेट्रिक टन आहे कारण भारतातील बहुतांश भागात डाळ खाल्ली जाते. नोव्हेंबरमध्ये तूरचे भाव सुमारे 40 टक्क्यांनी वाढलेले असल्याने डाळींची भाववाढ आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.