Veg Thali Cost: सर्वसामान्यांना मोठा धक्का! शाकाहारी थाळीच्या किमती 11 टक्क्यांनी वाढल्या; काय आहे कारण?

Non Veg Thali Cost: शाकाहारी थाळीच्या किमती सप्टेंबरमध्ये वार्षिक आधारावर 11 टक्क्यांनी वाढल्या, तर मांसाहारी थाळीच्या किमती 2 टक्क्यांनी स्वस्त झाल्या आहेत. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
Veg Thali Cost
Veg Thali CostSakal
Updated on

Veg Thali Cost: शाकाहारी थाळीच्या किमती सप्टेंबरमध्ये वार्षिक आधारावर 11 टक्क्यांनी वाढल्या, तर मांसाहारी थाळीच्या किमती 2 टक्क्यांनी स्वस्त झाल्या आहेत. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

शाकाहारी थाळीची वाढलेली किंमत ही भाज्यांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे झाली आहे. वार्षिक आधारावर कांद्याच्या भावात 53 टक्के, बटाट्याच्या भावात 50 टक्के आणि टोमॅटोच्या भावात 18 टक्क्यांची वाढ झाली आहे.

देशांतर्गत रेटिंग एजन्सी CRISILच्या अहवालानुसार, सप्टेंबर 2023 मध्ये शाकाहारी जेवणाच्या एका प्लेटची सरासरी किंमत 28.1 रुपये होती. या वर्षी सप्टेंबरमध्ये ती वाढून 31.3 रुपये झाली. तर ऑगस्टमध्ये त्याची सरासरी किंमत 31.2 रुपये होती. अशाप्रकारे सर्वसामान्यांची थाळी एका वर्षात 11 टक्क्यांनी महागली आहे.

'रोटी, राइस, रेट' अहवालात नेमकं काय?

'रोटी, राइस, रेट' या अहवालात म्हटले आहे की, सप्टेंबरमध्ये कांदा, बटाटा आणि टोमॅटोचे भाव अनुक्रमे 53 टक्के, 50 टक्के आणि 18 टक्क्यांनी वाढले आहेत. कांदा आणि बटाट्याची आवक कमी झाल्याने थाळीची किमत वाढली आहे. तर आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.

उत्पादनात घट झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत डाळींच्या किमती 14 टक्क्यांनी वाढल्या आहेत. असे अहवालात म्हटले आहे.

Veg Thali Cost
Nithin Kamath: भारतीय लोक श्रीमंतांचा द्वेष का करतात? नितीन कामथ यांनी सांगितलं कारण; म्हणाले, आपला समाज...

मांसाहारी थाळीची किंमत गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन टक्क्यांनी घसरून 59.3 रुपये झाली आहे, तर थाळीमधील 50 टक्के वाटा असलेल्या 'ब्रॉयलर' (मांस) च्या किमतीत 13 टक्क्यांनी घसरल्या आहेत. ऑगस्टच्या तुलनेत मांसाहाराच्या किमती स्थिर असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Veg Thali Cost
Bajaj Housing Finance: बजाज हाउसिंग फायनान्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होणार; ब्रोकरेजने वर्तवला अंदाज

CRISILचा हा अहवाल अशा वेळी आला आहे जेव्हा भारतीय रिझर्व्ह बँक पुढील आठवड्यात आपले द्वि-मासिक चलनविषयक धोरण जाहीर करणार आहे. चलनविषयक धोरणाद्वारे देशातील महागाई नियंत्रित केली जाते. भारतातील चलनविषयक धोरण ठरवण्यात किरकोळ चलनवाढ महत्त्वाची भूमिका बजावते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.