Veg Thali Price: सर्वसामान्यांना महागाईचा फटका; शाकाहारी थाळीच्या किमतीत 10 टक्क्यांनी वाढ, काय आहे कारण?

Roti Rice Rate Crisil Report: जूनमध्ये भारतात शाकाहारी थाळीच्या किमती 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या क्रिसिलच्या अहवालानुसार कांदा, बटाटा आणि टोमॅटोच्या किमतीत वाढ झाल्याने शाकाहारी थाळीच्या किमतीत वाढ झाली आहे.
Veg Thali
Vegetarian thali became costlier, non-veg cheaper Report Sakal
Updated on

Food Cost in India: जूनमध्ये भारतात शाकाहारी थाळीच्या किमती 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या क्रिसिलच्या अहवालानुसार कांदा, बटाटा आणि टोमॅटोच्या किमतीत वाढ झाल्याने शाकाहारी थाळीच्या किमतीत वाढ झाली आहे. मात्र या काळात ब्रॉयलर चिकनच्या कमी किमतीमुळे मांसाहारी थाळीच्या किमतीत 4 टक्क्यांनी घट झाली.

क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड ॲनालिसिसच्या मासिक 'रोटी राइस रेट' अहवालानुसार, शाकाहारी थाळीची किमत जूनमध्ये 29.4 रुपये झाली आहे, तर जून 2023 मध्ये ती 26.7 रुपये होती. मे महिन्यात शाकाहारी थाळीची किंमत 27.8 रुपये होती.

त्यामुळे शाकाहारी थाळीच्या दरात महिन्याला सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. शाकाहारी थाळीमध्ये रोटी, भाजी (कांदा, टोमॅटो आणि बटाटा), तांदूळ, डाळ, दही आणि कोशिंबीर असते.

टोमॅटोच्या दरात 30 टक्के, बटाट्याच्या दरात 59 टक्के आणि कांद्याच्या दरात 46 टक्के वाढ झाल्याने शाकाहारी थाळीच्या एकूण भावात वाढ झाली होती. प्रत्यक्षात कांद्याची रब्बी पेरणी कमी झाल्याने पिकाची आवक लक्षणीय घटली होती. तसेच मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बटाट्याच्या उत्पादनावर परिणाम झाला होता.

Veg Thali
Reliance Jio IPO: देशातील सर्वात मोठा IPO लॉन्च करण्याच्या तयारीत अंबानी; जिओ मोडणार LICचा रेकॉर्ड

क्रिसिलच्या अहवालानुसार टोमॅटोच्या किमतीत वाढ ही आवक कमी झाल्यामुळे झाली आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या मुख्य टोमॅटो उत्पादक प्रदेशातील उन्हाळी पीक जास्त तापमानामुळे खराब झाले होते आणि या राज्यांमधून टोमॅटोची आवक 35 टक्क्यांनी कमी झाली होती. याशिवाय तांदळाच्या किमती 13 टक्क्यांनी वाढल्या आहेत. भाताच्या पेरणीखालील क्षेत्रात घट झाली असून त्यामुळे भाताची आवकही घटली आहे.

खरीप हंगामात दुष्काळामुळे डाळींच्या किमती 22 टक्क्यांनी वाढल्या. जूनमध्ये मांसाहारी थाळीची किंमत 58 रुपयांपर्यंत घसरली, तर वर्षभरापूर्वी याच काळात थाळीची किंमत 60.5 रुपये होती. मे महिन्यात थाळीची किंमत 55.9 रुपये होती.

Veg Thali
Anil Ambani: अनिल अंबानींचे कर्ज राज्य सरकार फेडणार? MMRDAने स्पष्टचं सांगितलं

मांसाहारी थाळीतील पदार्थ शाकाहारी थाळीसारखेच आहेत, पण मसूरऐवजी चिकन आहे. अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत ब्रॉयलर चिकनच्या किमतीत सुमारे 14 टक्क्यांची घसरण झाली आहे. अधिक पुरवठा झाल्यामुळे मांसाहारी थाळीची किंमत कमी झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.