Veg, Non-Veg Thali Price (Marathi News): कांदा आणि टोमॅटोच्या दरात वाढ झाल्याने फेब्रुवारीमध्ये शाकाहारी थाळी सात टक्क्यांनी महागली आहे. मात्र, चिकनच्या दरात कपात झाल्याने मांसाहारी थाळीचे दर नऊ टक्क्यांनी स्वस्त झाले आहेत. यापूर्वी जानेवारीमध्येही असाच ट्रेंड होता. (Vegetarian thali becomes more affordable in February, non-veg thali costlier)
क्रिसिल मार्केट इंटेलिजेंस अँड ॲनालिसिसने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या मासिक अहवालात म्हटले आहे की, फेब्रुवारीमध्ये पोल्ट्रीच्या किंमतीत घट झाल्यामुळे मांसाहारी थाळी नऊ टक्क्यांनी स्वस्त झाली आहे.
यामध्ये 'व्हेज थाळी' आणि 'नॉन-व्हेज थाळी'ची किंमत शाकाहारी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणारे मुख्य पदार्थ आणि मांसाहारी पदार्थ बनवताना वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किंमतीच्या महागाईच्या आधारावर मोजण्यात आल्या आहेत.
क्रिसिलच्या मते, शाकाहारी थाळीची किंमत फेब्रुवारीमध्ये 27.5 रुपयांवर पोहोचली होती, तर एका वर्षापूर्वी ती 25.60 रुपये होती. या काळात कांद्याचे भाव 29 टक्के तर टोमॅटोचे 38 टक्के वाढले आहेत. मात्र, गेल्या महिन्याच्या तुलनेत थाळीच्या किंमतीत किरकोळ घट झाली आहे.
वर्षभरात कोंबडीच्या किंमती 20 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. मांसाहारी थाळीच्या खर्चात त्याचे 50 टक्के योगदान आहे. त्यामुळे मांसाहारी थाळी स्वस्त झाली आहे. या वर्षी जानेवारीच्या तुलनेत चिकनचे दर 10 टक्क्यांनी कमी झाले आहेत.
जानेवारीच्या 28 रुपयांच्या थाळीच्या तुलनेत गेल्या महिन्यात शाकाहारी थाळी स्वस्त झाली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे मांसाहारी थाळी सुमारे पाच रुपयांनी स्वस्त झाली आहे. गेल्या वर्षी मांसाहारी थाळी 59.2 रुपये होती, तर यंदा ती 54 रुपयांवर आली आहे.
‘ब्रॉयलर’ चिकनचे भाव 20 टक्क्यांनी घसरले आहेत. दरवर्षी मांसाहारी थाळीच्या किंमतीत घट होण्याचे हे प्रमुख कारण आहे. अहवालानुसार, बर्ड फ्लूचा प्रसार झाल्यामुळे पवित्र रमजान महिन्यापूर्वी चिकनचा पुरवठा मर्यादित झाला आहे. तसेच चिकनच्या मागणीत वाढ झाल्याने फेब्रुवारीमध्ये ब्रॉयलरच्या दरात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.