Disney Deal With Reliance Industries: मुकेश अंबानी OTT प्लॅटफार्मच्या जगात सर्वात मोठा उद्योग बनण्याच्या तयारीत आहेत. मुकेश अंबानी जगातील सर्वात मोठ्या प्रॉडक्शन स्टुडिओपैकी एक असलेल्या वॉल्ट डिस्नेचा भारतीय उद्योग विकत घेणार आहेत. वॉल्ट डिस्नेचा भारतीय उद्योग Disney + Hotstar म्हणून ओळखला जातो. सध्याच्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचे या अॅपवर थेट प्रक्षेपण केले जात आहे.
द इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, मुकेश अंबानींची डिस्नेसोबत डील झाल्यास जिओ सिनेमा आणि डिस्ने प्लस हॉटस्टारचे विलीनीकरण होऊ शकते. अशा प्रकारे, अंबानी OTT अॅप्सच्या जगावर राज्य करतील, कारण डिस्ने ही अमेरिकेतील सर्वात मोठी मनोरंजन कंपनी आहे. डिस्ने प्लस हॉटस्टार दीर्घकाळापासून भारतात व्यावसायिक आव्हानांना तोंड देत आहे.
डील झाल्यास एकत्रित संस्थेकडे 115 टीव्ही चॅनेल (स्टार इंडिया - 77 आणि वायकॉम18 - 38) आणि दोन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म-डिस्ने+ हॉटस्टार आणि जिओ सिनेमा-ची मालकी असेल.
डिस्ने भारतातील व्यवसायासाठी अनेक पर्यायांचा विचार करत आहे, ज्यात त्यांच्या टीव्ही आणि स्ट्रीमिंग मालमत्तेची संपूर्ण विक्री करण्याचा कंपनीचा विचार आहे.
डिजिटल व्हिडिओ स्ट्रीमिंग मार्केट (डिस्ने+ हॉटस्टार आणि जिओ सिनेमासह), नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ यासारख्या जागतिक कंपन्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण या कंपन्यांच्या व्यवसायावर याचा परिणाम होऊ शकतो.
डिस्ने-रिलायन्ससोबतचा हा करार रोख आणि शेअर्सच्या स्वरूपात असेल. मात्र, डिस्ने आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या दोघांनीही या करारावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. या करारानंतर मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडे देशातील सर्वात मोठे मनोरंजन नेटवर्क असेल.
या वर्षी, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ सिनेमा प्लॅटफॉर्मवर इंडियन प्रिमियम लीग म्हणजेच आयपीएलचे फ्री प्रेक्षेपण केले होते त्यामुळे जिओ सिनेमाच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.