FM Nirmala Sitharaman: तामिळनाडूतील कोईमतूर येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काही खाद्यपदार्थांवर वेगवगळ्या प्रकारे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारणीसंदर्भात एका उपाहारगृह साखळीच्या मालकाने सहज गमतीदार टिप्पणी केली. मात्र, यामुळे तो अडचणीत आला आणि त्याला माफी मागावी लागली.