Vijay Mallya : देश सोडून फरार झालेल्या विजय मल्ल्याने इंग्लंडमध्ये खरेदी केली 330 कोटींची मालमत्ता

विजय मल्ल्या हा आयडीबीआय बँक-किंगफिशर एअरलाइन्सच्या 900 कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणात आरोपी आहे.
Vijay Mallya
Vijay MallyaSakal
Updated on

Vijay Mallya : सीबीआयने फरार विजय मल्ल्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये सीबीआयने दावा केला आहे की, विजय मल्ल्याने 2015-16 या वर्षात इंग्लंड आणि फ्रान्समध्ये 330 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली होती.

जेव्हा त्याच्या किंगफिशर एअरलाइन्समध्ये आर्थिक संकट निर्माण झाले होते. तसेच बँकेतून घेतलेले कर्ज फेडळे नव्हते.

विजय मल्ल्या हा आयडीबीआय बँक-किंगफिशर एअरलाइन्सच्या 900 कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणात आरोपी आहे, ज्याची केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) मार्फत चौकशी केली जात आहे.

सीबीआयने नुकतेच विशेष सीबीआय न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. यामध्ये तपास यंत्रणेने मागील आरोपपत्रात सर्व 11 आरोपींसह आयडीबीआय बँकेचे माजी महाव्यवस्थापक बुद्धदेव दासगुप्ता यांचे नाव जोडले आहे.

चौकशी एजन्सीने आरोपपत्रात दावा केला आहे की दासगुप्ता यांनी आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर करत, आयडीबीआय बँक आणि विजय मल्ल्या यांच्या अधिकार्‍यांसोबत ऑक्टोबर 2009 मध्ये 150 कोटी रुपयांचे अल्प-मुदतीचे कर्ज (एसटीएल) मंजूर आणि वितरित करण्याच्या बाबतीत कट रचला.

Vijay Mallya
Hindenburg Research : हिंडेनबर्गचा नवा धमाका, अदानीनंतर आता कोणाबद्दल होणार मोठा खुलासा?

आरोपपत्रात असे म्हटले आहे की आयडीबीआय बँकेचे एक्सपोजर एकूण 750 कोटी रुपयांपर्यंत मर्यादित असायचे, परंतु डिसेंबर 2009 मध्ये ते 900 कोटी रुपयांपर्यंत वाढले कारण 150 कोटी रुपयांचे एसटीएल स्वतंत्र कर्ज म्हणून घेतले गेले होते.

तपासादरम्यान, सीबीआय न्यायालयाच्या परवानगीनुसार युनायटेड किंगडम, मॉरिशस, युनायटेड स्टेट्स आणि स्वित्झर्लंडला विनंती पत्र (एलआर) पाठविण्यात आले. या आरोपपत्रात परदेशातील तपासादरम्यान या देशांकडून गोळा केलेल्या पुराव्यांचा उल्लेख आहे.

एका देशातील न्यायालये लेटर्स रोगेटरी (LR) द्वारे न्याय प्रशासनासाठी दुसऱ्या देशातील न्यायालयांची मदत घेतात.

इंग्लंडमध्ये 80 कोटी आणि फ्रान्समध्ये 250 कोटींची मालमत्ता :

आरोपपत्रानुसार, विजय मल्ल्याने 2015-16 मध्ये यूकेमध्ये 80 कोटींची आणि 2008 मध्ये फ्रान्समध्ये 250 कोटींची मालमत्ता खरेदी केली होती. त्या काळात विमान कंपन्यांना रोख रकमेची तीव्र टंचाई जाणवत होती आणि मल्ल्याने बँकेचे कर्ज फेडले नव्हते.

आरोपपत्रात दावा करण्यात आला आहे की, मल्ल्याकडे 2008 ते 2016-17 दरम्यान मोठा निधी होता.

Vijay Mallya
एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

न्यायालयाने 2019 मध्ये फरार घोषित केले होते :

सीबीआय व्यतिरिक्त, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील मल्ल्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करत आहे.

5 जानेवारी 2019 रोजी मुंबईतील विशेष न्यायालयाने मल्ल्याला 'फरार' घोषित केले. कायद्यानुसार, एखाद्या व्यक्तीला आर्थिक गुन्हेगार घोषित केल्यावर तपास यंत्रणा त्याची मालमत्ता जप्त करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.