Adani-Visa Card: गौतम अदानी यांच्या अदानी समूहाचा एफएमसीजी ते विमानतळांपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये व्यवसाय आहे. आता अदानी नव्या क्षेत्रात उतरणार आहेत. लवकरच तुम्ही अदानी क्रेडिट कार्ड वापरु शकता.
सॅन फ्रान्सिस्को-आधारित व्हिसा ही जगातील दुसरी सर्वात मोठी कार्ड पेमेंट कंपनी आहे, नवीन को-ब्रँडेड क्रेडिट कार्डसाठी अदानी समूहाशी कंपनीने करार केला आहे.
अदानी-व्हिसा क्रेडिट कार्ड
ब्लूमबर्गमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, व्हिसा सीईओ रायन मॅकइनर्नी म्हणाले की कंपनीने को-ब्रँडेड क्रेडिट कार्डसाठी अदानी समूहासोबत करार केला आहे.
रायन म्हणाले की, अदानी समूहासोबतच्या भागीदारीमुळे व्हिसाला अदानी समूहाच्या विमानतळ आणि ऑनलाइन सेवांद्वारे 400 दशलक्ष वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
ग्राहकांना हे फायदे मिळू शकतात
इकोनॉमिक टाइम्सच्या बातमीत असे सांगण्यात आले आहे की अदानी ग्रुप आणि अमेरिकन डिजिटल पेमेंट गेटवे कंपनी व्हिसा यांनी को-ब्रँडेड कार्ड जारी करण्यासाठी एक नवीन करार केला आहे. दोघांनी आपापल्या करारावर सह्या केल्या आहेत.
हे कार्ड ग्राहकांना किरकोळ विक्रीपासून ते विमानतळ आणि ऑनलाइन प्रवासापर्यंतचे फायदे देऊ शकते. अशा प्रकारे, अदानी आणि व्हिसा यांचे को-ब्रँडेड कार्ड देशातील 40 कोटी ग्राहकांपर्यंत पाहचू शकतात.
अदानीकडे आता 7 विमानतळ आहेत
अदानी समूह सध्या भारतात 7 विमानतळ चालवतो. आगामी काळात अदानी समूह आपल्या नेटवर्कमध्ये आणखी विमानतळ जोडू शकतो. अदानी समूहाचे सात विमानतळ भारतातील बहुतांश हवाई वाहतूक हाताळतात.
या सात विमानतळांवर देशांतर्गत प्रवासी वाहतुकीत 92 टक्के आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत 133 टक्के वाढ झाली आहे.
अदानी समूहाने अलीकडेच प्रवासी क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. अदानी समूहाने ट्रेनमॅन हे प्लॅटफॉर्म विकत घेतले आहे, जे ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंग सेवा पुरवते.
यामुळे अदानी समुहाला प्रवासी क्षेत्रातील सहभाग वाढण्यास मदत होईल. दुसरीकडे, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांचा समूह एक सुपर अॅप आणण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे समूहाला त्यांच्या विविध सेवा एकत्रित करण्यात मदत होईल.
ही ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड्स आता बाजारात आहेत
ट्रॅव्हल फोकस्ड को-ब्रँडेड क्रेडिट कार्डसारखे सध्या बाजारात असे कोणतेही कार्ड नाही. सध्या आयसीआयसीआय बँक आणि मेक माय ट्रिप, एसबीआय आणि यात्रा आणि अॅक्सिस बँक आणि विस्तारा एकत्रितपणे ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड ऑफर करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.