Vision India@2047 Document: 2047 पर्यंत भारत 30 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याची अपेक्षा आहे. रविवारी माहिती देताना, NITI आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम म्हणाले की, पंतप्रधान मोदी पुढील तीन महिन्यांत व्हिजन इंडिया@2047 जाहिर करण्याची शक्यता आहे.
सुब्रमण्यम म्हणाले की, व्हिजन डॉक्युमेंटमध्ये उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक संरचनात्मक बदल आणि सुधारणांची रूपरेषा दिली जाईल. त्यात व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, भांडवल यांचा समावेश असेल. संशोधन आणि विकास संस्थांवरील देशाच्या जागतिक भागीदारीबद्दल तपशील असणे अपेक्षित आहे.
सध्या, भारत ही पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (GDP) आहे आणि या वर्षी GDP 3.7 ट्रिलियन डॉलर असेल असा अंदाज आहे. 2030 पर्यंत भारताचा जीडीपी जपान आणि जर्मनीला मागे टाकेल असा अंदाज आहे.
देश आणि त्यांचा GDP (अब्ज डॉलर्समध्ये)
युनायटेड स्टेट्स - 26,954
चीन - 17,786
जपान - 4,231
जर्मनी - 4,430
भारत - 3,730
युनायटेड किंगडम (यू.के.) - 3,332
फ्रान्स - 3,052
इटली - 2,190
ब्राझील - 2,132
कॅनडा - 2,122
स्रोत: फोर्ब्स
भारत 2030 पर्यंत जर्मनी आणि जपानला मागे टाकेल
यापूर्वी, S&P ग्लोबल आणि मॉर्गन स्टॅन्ले यांनी भाकीत केले होते की 2030 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था जपान आणि जर्मनीच्या अर्थव्यवस्थांना मागे टाकेल. गोल्डमन सॅक्सने आपल्या अहवालात म्हटले आहे की 2075 पर्यंत चीन 57 ट्रिलियन डॉलरसह जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल.
तर भारत 52.5 ट्रिलियन डॉलरसह दुसऱ्या स्थानावर असेल. यूएस अर्थव्यवस्था 51.5 ट्रिलियन डॉलरसह तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल. तर जपान 7.5 ट्रिलियन डॉलरसह पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.