दूरदर्शी दूरसंचार...

हातात मोबाइल नसणारा माणूस दाखवा आणि हजार रुपये मिळवा, अशी स्पर्धा ठेवली, तरी एकही स्पर्धक मिळणार नाही. कोठेही बाळगता येणारे हे छोटेखानी यंत्र आज मानवाचा एक अवयवच बनून गेला आहे. हा फोन जरा इकडे-तिकडे झाला, तरी माणूस अस्वस्थ होतो.
दूरदर्शी दूरसंचार...
दूरदर्शी दूरसंचार...sakal
Updated on

शेअर बाजार

गोपाळ गलगली,शेअर बाजाराचे अभ्यासक-विश्लेषक

हातात मोबाइल नसणारा माणूस दाखवा आणि हजार रुपये मिळवा, अशी स्पर्धा ठेवली, तरी एकही स्पर्धक मिळणार नाही. कोठेही बाळगता येणारे हे छोटेखानी यंत्र आज मानवाचा एक अवयवच बनून गेला आहे. हा फोन जरा इकडे-तिकडे झाला, तरी माणूस अस्वस्थ होतो. मग मोबाइल आणि तिची सेवा देणाऱ्या कंपन्यांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष गेल्यास आश्चर्य नाही. हातावर मोजता येणाऱ्या अशा या कंपन्या आपली मक्तेदारी बाळगून आहेत. भारतासारखा अवाढव्य देश आणि कोट्यवधी ग्राहक हे त्यांचे आश्रयस्थान आहे. प्रत्येक मोबाइल वापरकर्ता एकेका कंपनीला किती पैसे मिळवून देतो (ARPU) हे फार महत्त्वाचे आहे. एअरटेल २०८ रु., जिओ १८२ रु., व्होडा-आयडिया १४५ रु. असा अंदाज आहे. या कंपन्यांनी नुकतीच सेवादरात वाढ केल्याने त्यांच्या शेअरभावातही वाढ दिसत आहे. सेवादरातील २० टक्के वाढ कंपन्यांच्या फायद्यात १० ते १५ टक्क्यांची भर टाकते, असे समजते.

दूरसंचार कंपन्यांचा बाजारहिस्सा

  • (फेब्रुवारी २०२४)

  • रिलायन्स जिओ : ४०.४८ टक्के

  • भारती एअरटेल : ३३.१३ टक्के

  • व्होडाफोन आयडिया : १८.७७ टक्के

  • बीएसएनएल : ७.४० टक्के

  • एमटीएनएल : ०.२२ टक्के

हा दूरसंचार व्यवसाय एकूण देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) ६.५ टक्क्यांची भर घालत असून, त्यात वाढीची मोठी संधी आहे.

सारांश : येत्या २-३ वर्षांत भारत जगातील दोन क्रमांकाचा ‘स्मार्ट फोन देश’ बनण्याची शक्यता आहे. तोपर्यंत अंदाजे ९२ कोटी भारतीय ‘स्मार्ट फोन’ वापरू लागतील. भारत आता मोबाइल फोनदेखील बनवू लागला असून, २०२५-२६ पर्यंत १२६ अब्ज डॉलरचे मोबाइल फोन निर्मितीची शक्यता आहे. अशा या अवाढव्य मोबाइल व्यवसायाची वेगाने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे या क्षेत्राकडे गुंतवणूकदारांनी बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.