Vistara-Air India Merger: एव्हिएशन कंपनी विस्तारा आपल्या ब्रँड अंतर्गत 11 नोव्हेंबर रोजी शेवटची फ्लाइट चालवणार आहे. एअर इंडिया कंपनी 12 नोव्हेंबर 2024 पासून विस्ताराचे ऑपरेशन्स हाती घेणार आहे.
एअर इंडिया-विस्तारा विलीनीकरणाचा एक भाग म्हणून सरकारने सिंगापूर एअरलाइन्सद्वारे थेट विदेशी गुंतवणुकीला (FDI) मान्यता दिली आहे. विस्तारा हा टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाइन्सचा संयुक्त उपक्रम आहे. एअर इंडिया टाटा समूहाच्या मालकीची आहे.