Wagh Bakri Tea: वाघ बकरी ग्रुपचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे निधन

Wagh Bakri Tea: ब्रेन हॅमरेजमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,
Wagh Bakri Group Executive Director Parag Desai passes away
Wagh Bakri Group Executive Director Parag Desai passes away Sakal
Updated on

Wagh Bakri Tea: गुजरातमधील प्रसिद्ध वाघ बकरी चहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे निधन झाले आहे. ते 49 वर्षांचे होते. ब्रेन हॅमरेजमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, ते अनेक दिवस व्हेंटिलेटरवर होते.

पराग देसाई 15 ऑक्टोबर रोजी त्यांच्या राहत्या घराजवळील इस्कॉन आंबळी रोडजवळ मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असताना त्यांचा अपघात झाला. यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्यामुळे त्यांना ब्रेन हॅमरेज झाला.

त्यानंतर त्यांना अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना हेबतपूर रोडवरील दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.

Wagh Bakri Group Executive Director Parag Desai passes away
Investment : नव्या करप्रणालीतही गुंतवणूक आवश्‍यक

माहितीनुसार, त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यांचे निधन होण्यापूर्वी त्यांना सात दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. देसाई यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले.

Wagh Bakri Group Executive Director Parag Desai passes away
Adani Group: आणखी एक कंपनी विकत घेण्याच्या तयारीत गौतम अदानी, सिमेंटनंतर वीज क्षेत्रात करणार मोठी गुंतवणूक

पराग देसाई हे वाघ बकरी चहा कंपनीत कार्यकारी संचालक पदावर होते. त्यांनी अमेरिकेच्या लाँग आयलँड विद्यापीठातून एमबीए केले होते. ते चहा समूहाचे चौथ्या पिढीतील उद्योजक होते. समूहाच्या विक्री, विपणन आणि निर्यात विभागाचे नेतृत्व करण्याबरोबरच त्यांनी ब्रँडला नवीन उंचीवर नेले.

1995 मध्ये कंपनीत रुजू झाले

पराग देसाई 1995 मध्ये वाघ बकरी चहामध्ये रुजू झाले. त्यावेळी कंपनीची एकूण उलाढाल 100 कोटी रुपयांपेक्षा कमी होती. पण आज वार्षिक उलाढाल 2,000 कोटींच्या पुढे गेली आहे. वाघ बकरी चहा भारतातील 24 राज्यांमध्ये तसेच जगातील 60 देशांमध्ये निर्यात केला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.