Walt Disney: डिस्नेला भारत परवडेना, व्यवसायाच्या विक्रीसाठी भागीदाराच्या शोधात

वॉल्ट डिस्नीला अद्याप कोणताही संभाव्य खरेदीदार किंवा भागीदार मिळाला नाही.
Disney
Disney Sakal
Updated on

Walt Disney: वॉल्ट डिस्नी भारतातील डिजिटल आणि टीव्ही व्यवसायाच्या विक्री किंवा संयुक्त उपक्रमावर विचार करत आहे, अशी बातमी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने अज्ञात स्त्रोताच्या हवाल्याने दिली आहे. वॉल्ट डिस्नीला अद्याप कोणताही संभाव्य खरेदीदार किंवा भागीदार मिळाला नाही. रॉयटर्सच्या अहवालानुसार डिस्नी भारतातील व्यवसायासाठी नवीन प्लॅन बनवण्याची चर्चा करत आहे.

कंपनी भारतातील व्यवसायाच्या वाढीसाठी नवीन पर्याय शोधण्यासाठी किमान एका बँकेशी संपर्क साधला होता. डिस्नेला रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म, जिओ सिनेमाच्या दबावाचा सामना करावा लागत आहे.

JioCinema ने इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत मोफत प्रवेश देऊन लोकप्रियता मिळवली आहे, जी पूर्वी Disney च्या मालकीची होती.

Disney
Vastu Tips for Wealth: काही केल्या पैसा टिकत नाही, मग पर्स मध्ये ठेवा या वस्तू आणि पहा कमाल

रिसर्च फर्म CLSA चा अंदाज आहे की Disney + Hotstar ने Disney च्या मालकीची स्ट्रीमिंग सेवा, IPL चे डिजिटल अधिकार गमावल्यानंतर भारतात जवळपास 5 दशलक्ष युजर्सची घट झाली आहे.

याव्यतिरिक्त, JioCinema चालवणाऱ्या Reliance च्या Viacom18 ने एप्रिलमध्ये वॉर्नर ब्रदर्सशी करार केला. Disney's India च्या व्यवसायामध्ये Disney+ Hotstar स्ट्रीमिंग सेवा आणि Star India यांचा समावेश आहे.

डिस्ने, स्ट्रीमिंग आणि मीडिया क्षेत्रातील इतर इंडस्ट्री खेळाडूंसह, जाहिरातींच्या कमाईवर आणि ग्राहकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे कंपनीने खर्चात कपात करण्यासाठी अनेक निर्णय घेतले. फेब्रुवारीमध्ये, कंपनीने 5.5 अब्ज डॉलर खर्च वाचवण्याच्या उद्देशाने 7,000 नोकर कपात केली होती.

Disney
Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.