WeWork files for bankruptcy: जगभरातील ऑफिसेससाठी व्यावसायिक जागा उपलब्ध करून देणारी WeWork Global या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली आहे. WeWork ही कंपनी ऑफिसेससाठी जागा उपलब्ध करून देते, मोठ्या कर्जामुळे आणि प्रचंड तोट्यामुळे कंपनी आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. या वर्षीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर कंपनीच्या शेअर्समध्ये यावर्षी सुमारे 96 टक्क्यांची घसरण झाली आहे.
कंपनीवर किती कर्ज आहे?
कंपनीवर जूनच्या अखेरीस निव्वळ दीर्घ मुदतीचे कर्ज 2.9 अब्ज डॉलर आणि दीर्घकालीन 13 अब्ज डॉलरहून अधिक कर्ज होते. मूल्यांकनाबद्दल बोलायचे तर, 2019 मध्ये कंपनीचे मूल्यांकन 47 अब्ज डॉलर होते.
व्यवसायावर परिणाम होणार नाही
दिवाळखोरीच्या वृत्तादरम्यान, कंपनीने आपल्या कामाबाबत एक निवेदन दिले आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की कंपनीने दिवाळखोरी दाखल केली तरी त्याचा WeWork इंडियाच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही. WeWork इंडियाची भारतातील 7 शहरांमध्ये (नवी दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, मुंबई, बेंगळुरू, पुणे आणि हैदराबाद) 50 ऑफिसेस आहेत.
जागेच्या मागणीत घट
गेल्या काही वर्षांपासून कंपनीला अनेक आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. WeWork साठी सर्वात मोठी समस्या म्हणजे जागांच्या मागणीत सतत होणारी घट.
अहवालानुसार, कोरोना काळात WeWork च्या समस्या आणखी वाढल्या होत्या, जेव्हा कंपन्यांनी त्यांची ऑफिसेस रिकामी केली आणि कर्मचारी घरून काम करू लागले. काही कंपन्यांनी ऑफिसेस उघडली आहेत, परंतु जागांची मागणी कोरोनापूर्वी सारखी राहिली नाही.
दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचणे हा WeWork साठी मोठा धक्का आहे. माजी सीईओ आणि सह-संस्थापक अॅडम न्यूमन म्हणाले की दिवाळखोरी दाखल करणे हे आमच्यासाठी निराशाजनक आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.