आर्थिक गैरव्यवहार म्हणजे नेमके काय?
आर्थिक गैरव्यवहार म्हणजे नेमके काय?sakal

आर्थिक गैरव्यवहार म्हणजे नेमके काय?

सर्व प्रकारच्या बँका, पतसंस्था, बिगर वित्तीय संस्था (एनबीएफसी) यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे वारंवार दिसून येते.
Published on

अर्थबोध

सुधाकर कुलकर्णी,सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी

सर्व प्रकारच्या बँका, पतसंस्था, बिगर वित्तीय संस्था (एनबीएफसी) यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे वारंवार दिसून येते. विशेषत: ऑनलाइन बँकिंग; तसेच मोबाईल बँकिंग, भीम, गुगलपे, फोनपे यांसारख्या डिजिटल पेमेंट पद्धतीचा सातत्याने वाढत असलेला वापर यामुळे आर्थिक गैरव्यवहारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. नेमका कोणता आर्थिक व्यवहार गैरव्यवहार (फ्रॉड) समजला जातो याची पुरेशी माहिती सर्वांना असतेच असे नाही. याबाबत सुस्पष्टता यावी व आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण यावे या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतेच एक परिपत्रक काढले असून, ते सर्व प्रकारच्या वित्तीय संस्थाना लागू आहे. त्यानुसार प्रामुख्याने खालील दहा प्रकारचे व्यवहार गैरव्यवहार (फ्रॉड) या सदरात येतील.

१ उपलब्ध निधीचा गैरवापर व विश्वासघात

२ बनावट चेक किंवा कागदपत्रे वापरून रक्कम काढणे

३खात्यात फेरफार (बदल) करणे किंवा बेनामी खात्यातून व्यवहार करणे

४वस्तुस्थिती लपवून (फसवणूक करून) व्यवहार करणे किंवा तोतयागिरी करून व्यवहार करणे

५खोटे (चुकीचे) दस्तऐवज किंवा खोटे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार करून व्यवहार करणे

६बुक्स ऑफ अकाउंट/ अन्य महत्त्वाची कागदपत्रे यामध्ये जाणीवपूर्वक बदल करून केलेले व्यवहार.

७ लाच घेऊन किंवा देऊन मंजूर झालेली कर्जे

८ गैरव्यवहारामुळे निर्माण झालेली रोख रकमेतील कमतरता

९ विदेश विनिमय व्यवहारातील गैरव्यवहार

१० डिजिटल व इलेक्ट्रॉनिक व्यवहारातून (उदा. क्यूआर कोड, पेमेंट लिंक, मोबाइल अॅप, बक्षिसाचे अामिष किंवा क्रेडिट, डेबिट कार्ड ब्लॉक करणे, लाईट बिल/मोबाइल बिल यासारखे बिल पेमेंट थकीत असल्याचे भासवून लिंकवर पेमेंट करण्यास भाग पडणे).

ग्राहकांनी व वित्तीय संस्थांनी याबाबत योग्य ती दखल घेऊन वरीलपैकी कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित सबंधित वित्तीय संस्था; तसेच पोलिस खात्यातील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग किंवा ‘सायबर सेल’ला (सायबर गुन्हा असल्यास) कळवावे, जेणेकरून पुढील आर्थिक गैरव्यवहार टाळला जाईल व झालेल्या गैरव्यवहाराचा तपास लवकर लागणे शक्य होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.