2000 Rupees Note: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांची नोट काढून घेण्याचा निर्णय घेतला. या नोटा 23 मे पासून बँकांमध्ये बदलल्या जातील. त्यात बदल करण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर सर्व बँकांमधून जमा झालेल्या 2,000 च्या नोटा RBI कडे परत जातील.
पण प्रश्न असा आहे की, या नोटा पूर्णपणे रद्दी झाल्या आहेत की आरबीआय त्यांचा आणखी काही उपयोग करू शकेल? चला समजून घेऊ. जमा झालेल्या नोटांचे पुढे काय होते?
जमा झालेल्या सर्व नोटा RBI कडे पोहोचल्यावर त्या करेंसी वेरिफिकेशन अँड प्रोसेसिंग सिस्टम (CVPS) मध्ये टाकल्या जातील. एक CVPS मशीन एका तासात 50 ते 60 हजारांच्या नोटांवर प्रक्रिया करू शकते. ही मशीन नोटा मोजते, खऱ्या आहेत की नाही हे तपासते.
त्यानंतर, ती नोट फिट आणि अनफिट कॅटेगरीमध्ये विभागली जाते. खराब नोटा कागदाच्या श्रेडरमध्ये टाकल्या जातात आणि त्याचे तुकडे केले जाताता.
चांगल्या नोटा अशा प्रकारे कापल्या जातात की त्या नवीन चलनी नोटा बनवण्यासाठी रिसायकल केल्या जाऊ शकतात.
यापूर्वी अनफिट नोटा जाळण्यात आल्या होत्या. पण या मार्गाने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. अनफिट नोटा ब्रिकेटिंग सिस्टमला पाठवल्या जातात.
जिथे त्यावर प्रक्रिया करून ब्रिकेट बनवले जातात. हे ब्रिकेट पेपर बोर्ड इत्यादी तयार करण्यासाठी देखील वापरले जातात.
या ब्रिकेट्स विकण्यासाठी आरबीआय निविदा मागवते. 2016 मध्ये, जेव्हा नोटाबंदीमध्ये 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद केल्या गेल्या, तेव्हा फाटलेल्या नोटा वेस्टर्न इंडिया प्लायवूड्स लिमिटेडला विकल्या गेल्या. यावेळीही तीच प्रक्रिया अवलंबली जाऊ शकते, असे मानले जात आहे.
जळालेल्या किंवा खराब झालेल्या नोटाही बँकेत जमा करता येतात. या नोटांच्या बदल्यात बँका तुम्हाला चांगल्या नोटा देतात. सर्व खराब नोटा गोळा करून त्या RBI च्या CVPS ला पाठवल्या जातात.
RBI च्या 2021-22 च्या वार्षिक अहवालानुसार, या वर्षी खराब झालेल्या 1878.01 कोटी नोटांची विल्हेवाट लावली गेली, जी 2020-21 च्या तुलनेत 88.4 टक्के जास्त होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.