Sundar Pichai: सुंदर पिचाई यांनी गुगलमध्ये पूर्ण केली 20 वर्षे; म्हणाले, ''खूप काही बदलले आहे, माझे केसही...''

20 Years In Google: गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कंपनीतील त्यांचा वीस वर्षांचा प्रदीर्घ प्रवास पूर्ण केला आहे. पिचाई यांनी इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे या खास प्रसंगी आपला आनंद व्यक्त केला आहे.
What hasn’t changed says Sundar Pichai reflects on his 20 year journey at Google
What hasn’t changed says Sundar Pichai reflects on his 20 year journey at Google Sakal
Updated on

20 Years In Google: गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कंपनीतील त्यांचा वीस वर्षांचा प्रदीर्घ प्रवास पूर्ण केला आहे. पिचाई यांनी इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे या खास प्रसंगी आपला आनंद व्यक्त केला आहे. गुगल या एकाच कंपनीत दोन दशके पूर्ण केल्याबद्दल पिचाई यांनी इंस्टाग्रामवर एक छोटी टीप शेअर केली. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी गेल्या 20 वर्षातील त्यांच्या प्रवासाची झलक दिली आहे.

पिचाई यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “26 एप्रिल 2004 माझा गुगलमध्ये पहिला दिवस होता. तेव्हापासून बरेच काही बदलले आहे – तंत्रज्ञान, आमची उत्पादने वापरणाऱ्या लोकांची संख्या... माझे केस. काय बदलले नाही – या कंपनीसाठी काम करताना मला आनंद मिळतो. 20 वर्षांनंतरही मी स्वतःला भाग्यवान समजतो"

What hasn’t changed says Sundar Pichai reflects on his 20 year journey at Google
US Food Regulator: अमेरिकेतही एव्हरेस्ट आणि एमडीएचवर येणार बंदी? एफडीए झाली सतर्क

सुंदर पिचाई यांनी शेअर केलेल्या इंस्टाग्राम पोस्टसोबत एक फोटोही शेअर केला आहे. काही फुगे चित्रात दाखवले आहेत, ज्यात '20' अंक असणारे दोन फुगे आहेत. याशिवाय एक दिवा देखील आहे ज्यावर '20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन' असे लिहिले आहे. टेबलावर दोन फोटो देखील आहेत.

पिचाई यांनी 26 एप्रिल रोजी रात्री उशिरा ही पोस्ट शेअर केली होती, ज्याला आतापर्यंत 91,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. पिचाई यांच्या पोस्टवर काही लोकांनी 'अभिनंदन' लिहिले.

What hasn’t changed says Sundar Pichai reflects on his 20 year journey at Google
Indian CEO In USA: 'अमेरिकेत कंपनीचा CEO होण्यासाठी भारतीय असणं गरजेचं', असं का बोलले अमेरिकेचे राजदूत?

एका युजरने असेही म्हटले की, तुमचे केस कमी झाले आहेत, पण गुगलचा महसूल वाढला आहे. सुंदर पिचाई हे गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ आहेत आणि अल्फाबेटच्या संचालक मंडळात त्यांचा समावेश आहे. ते 2004 मध्ये कंपनीत प्रोडक्ट मॅनेजर म्हणून रुजू झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.