Child Mutual Fund: काय आहे चाइल्ड म्युच्युअल फंड? ज्याद्वारे तुमच्या मुलांचे भविष्य होऊ शकतं सुरक्षित

Child Mutual Fund Schemes: पालकांना नेहमीच मुलांच्या भविष्याची चिंता असते.
Child Mutual Fund
Child Mutual FundSakal
Updated on

Child Mutual Fund: पालकांना नेहमी मुलांच्या भविष्याची चिंता असते. मुलांचे शिक्षण, लग्न यासारख्या मोठ्या खर्चासाठी वेळेत मोठा निधी जमा करणे हे आव्हान आहे. चाइल्ड म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून हे काम सोपे करता येते. चाइल्ड म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि तुम्ही त्यामध्ये कशी गुंतवणूक करू शकता?

चाइल्ड म्युच्युअल फंड म्हणजे काय?

चाइल्ड म्युच्युअल फंड हा एक प्रकारचा म्युच्युअल फंड आहे, ज्यामध्ये फक्त मुलांच्या नावाने खाते उघडता येते. कमी जोखमीसह जास्तीत जास्त परतावा मिळवणे हा या प्रकारच्या फंडाचा उद्देश आहे. या प्रकारच्या फंडाचा पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण ठेवला जातो.

बहुतेक चाइल्ड म्युच्युअल फंड हायब्रिड म्युच्युअल फंड श्रेणीत येतात. पोर्टफोलिओमध्ये इक्विटीसह कर्ज आणि रोख्यांची गुंतवणूक केली जाते.

Child Mutual Fund
Tata Technologies IPO: 20 वर्षानंतर येतोय टाटांचा IPO, काय असेल प्राइस बँड?

SIP द्वारे गुंतवणूक करण्याचा उत्तम पर्याय

चाइल्ड म्युच्युअल फंडामध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागते. या कारणास्तव एसआयपीद्वारे गुंतवणूक करणे चांगले मानले जाते. अशा फंडातील गुंतवणूक ही मुलांच्या नावावरच केली जाते.

काही म्युच्युअल फंडांचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांपर्यंत असतो. ज्या मुलाच्या नावाने चाइल्ड म्युच्युअल फंड केला आहे त्याला वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर म्युच्युअल फंड व्यवस्थापनाचा अधिकार मिळतो. जर तुम्हाला म्युच्युअल फंडात फक्त मुलाच्या नावावर गुंतवणूक करायची असेल तर हा पर्याय असू शकतो.

Child Mutual Fund
Zee-Sony Merger: आता स्वस्तात पाहता येणार चित्रपट? Zee आणि Sonyच्या मर्जरनंतर प्रेक्षकांना असा होणार फायदा

चाइल्ड म्युच्युअल फंड योजना

चाइल्ड म्युच्युअल फंड योजना देशातील जवळपास सर्व मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या चालवतात. यामध्ये यूटीआय चिल्ड्रन्स करिअर फंड इन्व्हेस्टमेंट प्लॅन, टाटा यंग सिटिझन्स फंड, आयसीआयसीआय प्रू चाइल्ड केअर गिफ्ट प्लॅन आणि एचडीएफसी चिल्ड्रन्स गिफ्ट फंड यासारख्या फंडांची नावे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.