Ghost Jobs: तुमच्यासोबत असे कधी घडले आहे का की तुम्ही नोकरीसाठी अर्ज केला आणि नंतर उत्तराच्या प्रतीक्षेत अनेक दिवस घालवलेत? किंवा असही झालं असेल की तुम्ही याला तुमचं नशीब मानता आणि थकून जाता आणि अर्ज केलेली नोकरी विसरून जाता.
तर तुम्ही'घोस्ट जॉब'चे बळी ठरला आहात. होय, या अशा नोकरीच्या जाहिराती आहेत ज्यांच्या मागे दडलेले आहे कंपन्यांचे काळे सत्य! लाखो नोकऱ्यांच्या जाहिरातींमध्ये, कंपन्यांमध्ये भरती थांबली आहे का? या कंपन्या आपल्याला स्वप्न दाखवत आहेत की आर्थिकदृष्ट्या स्थिर असल्याचे भासवत आहेत? नेमकं भारतीय कंपन्यांमध्ये काय घडतयं? याबद्दल जाणून घेऊया.