Interim Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला 2024 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. लवकरच लोकसभा निवडणुका होणार असल्याने हा अंतरिम अर्थसंकल्प असेल. सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्यावर किंवा नवीन सरकार पदभार स्वीकारणार असताना सरकार अंतरिम अर्थसंकल्प सादर करते.
नवीन सरकार पूर्ण अर्थसंकल्प तयार करून सादर करेपर्यंत अल्प कालावधीसाठी सरकारच्या खर्चाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून काम करते.
भारतीय घटनेच्या कलम 112 नुसार पूर्ण अर्थसंकल्प तर 116 प्रमाणे अंतरिम अर्थसंकल्प संसदेला सादर करता येतो. अंतरिम अर्थसंकल्प ही एक तात्पुरती सोय किंवा व्यवस्था असते.
1 मार्चपासून नवीन सरकार स्थापनेपर्यंतच्या सरकारी खर्चासाठी विद्यमान सरकारला अंतरिम कालावधीत खर्च उचलण्यासाठी संसदेची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे अंतरिम अर्थसंकल्प जाहीर करण्यात येतो. (What Is Interim Budget 2024)
अंतरिम बजेटमध्ये काय असते?
अंतरिम अर्थसंकल्पात साधारणपणे चालू सरकारचा खर्च, महसूल, वित्तीय तूट, आर्थिक कामगिरी आणि आगामी आर्थिक वर्षातील अंदाज यांचा समावेश असतो. यामध्ये कोणत्याही मोठ्या धोरणाच्या घोषणेचा समावेश असू शकत नाही.
निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेनुसार अंतरिम बजेटमध्ये कोणत्याही मोठ्या योजनेचा समावेश करता येणार नाही कारण त्याचा मतदारांवर प्रभाव पडू शकतो.
अंतरिम अर्थसंकल्पाद्वारे, सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी पगार, विविध क्षेत्रातील चालू खर्च इत्यादी आवश्यक सरकारी खर्चांची पूर्तता करण्यासाठी संसदेत मतदान होते कोणत्याही चर्चेविना ते अधिवेशन म्हणून मंजूर केले जाते.
निवडणुकीच्या वर्षात दोनदा अर्थसंकल्प सादर केला जातो
निवडणुकीच्या वर्षात दोनदा अर्थसंकल्प सादर केला जातो. कारण नवीन सरकार सत्तेवर आल्यास जुन्या सरकारच्या योजना, धोरणे आणि बजेटमध्येही बदल करू शकतात.
त्यामुळे निवडणुकीच्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जातो. त्यानंतर जे सरकार पुन्हा सत्तेवर येते ते पूर्ण अर्थसंकल्प सादर करते.
मोदी सरकारचा दुसरा अंतरिम अर्थसंकल्प
अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारचा दुसरा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करणार आहेत. 2019 च्या सुरुवातीला पीयूष गोयल, जे त्यावेळी अर्थ मंत्रालयाचे काम पाहत होते. त्यांनी अंतरिम बजेट सादर केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.