Women's Day 2024 : मुलीच्या भविष्याची चिंता सोडा.. 'या' योजनेत गुंतवणूक केल्यास केवळ व्याजाचेच मिळतील 18 लाख! जाणून घ्या

Investment for Girl Child : जितक्या लवकर तुम्ही यामध्ये गुंतवणूक कराल तितक्या लवकर तुम्ही तुमच्या मुलीसाठी मोठा फंड तयार करू शकता.
Sukanya Samruddhi Yojana
Sukanya Samruddhi YojanaeSakal
Updated on

What is Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजना () केवळ मुलींसाठी सरकारद्वारे चालवली जाणारी योजना आहे. तुम्ही मुलीचे पालक असाल आणि तुमच्या मुलीचे वय 10 वर्षांपर्यंत असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेत किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये जमा करता येतील. सुकन्या समृद्धी योजनेत, तुम्हाला 15 वर्ष सतत गुंतवणूक करावी लागेल आणि योजना 21 वर्षांनी परिपक्व होईल. तुम्ही या योजनेत दर महिन्याला 5000 रुपये गुंतवले तर तुम्ही एक चांगली रक्कम जमा करू शकता. सध्या सुकन्या समृद्धी योजनेवर वार्षिक 8 टक्के व्याज आहे.

सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही दर महिन्याला 5000 रुपये गुंतवल्यास तुम्हाला वार्षिक 60,000 रुपये लागतील. अशा प्रकारे, तुम्ही 15 वर्षांत एकूण 9 लाखाची गुंतवणूक कराल. तुम्ही 15 ते 21 वर्षांच्या दरम्यान कोणतीही गुंतवणूक करणार नाही, पण तुमच्या रकमेवर 8 टक्के दराने व्याज जोडले जाईल. (Sukanya Yojana Details)

आता तुम्ही SSY कॅल्क्युलेटरनुसार हिशोब केला तर तुम्हाला तुमच्या एकूण 9 लाखाच्या गुंतवणुकीवर 17 लाख 93 हजार 814 रुपये व्याज मिळेल, जे तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या जवळपास दुप्पट असेल. अशा परिस्थितीत, तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 26,93,814 रुपये म्हणजेच अंदाजे 27 लाख रुपये मिळतील. जर तुम्ही ही गुंतवणूक 2023 मध्ये सुरू केली तर तुम्हाला 2044 मध्ये मॅच्युरिटी रक्कम मिळेल. ही रक्कम तुम्ही तुमच्या मुलीच्या गरजेनुसार तिच्या अभ्यासासाठी किंवा लग्नासाठी खर्च करू शकता.

Sukanya Samruddhi Yojana
PM Modi Big Announcement On Womens Day: महिला दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं गिफ्ट; LPG गॅस सिलेंडरवर 100 रुपयांची सूट

इथे घाई फायदा देई..

जितक्या लवकर तुम्ही यामध्ये गुंतवणूक कराल तितक्या लवकर तुम्ही तुमच्या मुलीसाठी मोठा फंड तयार करू शकता. सुकन्या समृद्धी योजनेत 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते आणि ती 21 वर्षात मॅच्युअर होते. जर तुम्ही तुमच्या मुलीचा जन्म होताच तिच्या नावावर हे खाते उघडले तर वयाच्या 21 व्या वर्षी तुम्ही तिच्यासाठी 70 लाखांचा मोठा फंड तयार करु शकता.

सुकन्या समृद्धी खात्यात दरवर्षी मुलीच्या नावावर 1.5 लाख जमा केले तर तुम्हाला दरमहा 12,500 रुपये गुंतवणुक करावे लागतील. 15 वर्षात एकूण 22 लाख 50 हजारांची गुंतवणूक कराल. सध्या या योजनेवर 8.2 टक्के व्याज आहे. 21 वर्षांच्या मॅच्युरिटी वेळी एकूण 46 लाख 77 हजार 578 रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा परिस्थितीत, मॅच्युरिटीवर मुलीला एकूण 22,50,000 रुपये + 46,77,578 रुपये = म्हणजेच एकूण 69,27,578 (सुमारे 70 लाख रुपये) मिळतील.

सुकन्या समृद्धी योजनेत 2024 मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर ही योजना 2045 मध्ये मॅच्युअर होईल, म्हणजेच तुम्हाला या योजनेचे संपूर्ण पैसे 2045 पर्यंत मिळतील. सुकन्या समृद्धी योजनेचा एक मोठा फायदा म्हणजे गुंतवणूकदार आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर वाचवू शकतात. सुकन्या समृद्धी योजनेचे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत उघडता येते.

Sukanya Samruddhi Yojana
'ब्रेडविनर' महिलांनी असं करा आर्थिक नियोजन

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()