RBI Notes: तुमच्या खिशातली नोट 'फर्जी' तर नाही...कागदापासून नव्हे तर 'या' वस्तुपासून बनवल्या जातात नोटा

नोट छापल्यानंतर बँकेची नोट तुमच्यापर्यंत कशी पोहोचते हे तुम्हाला माहिती आहे का?
Indian Currency Notes
Indian Currency NotesSakal
Updated on

Indian Currency Notes: काही काळापूर्वी आलेल्या 'फर्जी' या वेब सीरिजमध्ये मनी प्रिंटिंगची गोष्ट सांगण्यात आली होती. त्यात एका खास कागदाविषयी सांगितले होते ज्यातून चलनी नोटा बनवल्या जातात.

पण तुम्हाला माहित आहे का की भारतातील ही चलनी नोट झाडे कापून बनवलेल्या कागदापासून बनली जात नाही तर यासाठी कापडी साहित्याचा वापर केला जातो.

आरबीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, भारतातील चलनी नोटा 100 टक्के कॉटन फायबरपासून बनवल्या जातात. होय, तुमच्या हातात ठेवलेली ती नोट कागदाची नसून कापसाची आहे.

कापूस अधिक टिकाऊ असल्यामुळे नोटा तयार करण्यासाठी कापसाचा वापर केला जातो. त्याचे आयुष्य अधिक असते आणि ते लवकर कापत नाही किंवा ओले होत नाही. यामुळे नोटेचे आयुष्य वाढते.

आरबीआय कापसापासून बनवलेला हा कागद तीन ठिकाणांहून मागवते. हा कागद महाराष्ट्रातील करन्सी नोट प्रेस, दुसरे म्हणजे मध्य प्रदेशातील होशंगाबाद पेपर मिल आणि परदेशातून आयात केला जातो.

नोटेवर वापरलेली ऑफसेट शाई देवास बँक नोट प्रेसमधून येते. तर नक्षीदार शाईचा पुरवठा सिक्कीममधील परदेशी कंपनीकडून केला जातो.

Indian Currency Notes
Rs 75 Coin: PM मोदींनी जारी केले 75 रुपयांचे नाणे, कुठं मिळणार, किती आहे किंमत? जाणून घ्या सर्व काही

देशात 4 ठिकाणी नोटा छापल्या जातात. देवास, नाशिक, सालबोनी आणि म्हैसूर येथे नोट प्रेस आहेत. म्हैसूरमध्येच एक हजाराच्या नोटा छापण्यात आल्या होत्या पण 2016 मध्ये त्या बंद करण्यात आल्या.

RBI 10 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंतच्या नोटा छापते. आरबीआयने 5 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली असली तरी त्या अवैध नाहीत. नाणी छापण्याचे वेगळे कारखाने आहेत. हे मुंबई, नोएडा, हैदराबाद आणि कोलकाता येथे आहेत.

नोट छापल्यानंतर बँकेची नोट तुमच्यापर्यंत कशी पोहोचते हे तुम्हाला माहिती आहे का? यासाठी आरबीआयची 18 इश्यू ऑफिसेस आहेत. याशिवाय लखनौमध्ये कार्यालय आहे. नोटा छापल्यानंतर सर्वप्रथम नोट या कार्यालयात येतात. यानंतर, येथून नोटा व्यावसायिक बँकांकडे पाठवल्या जातात.

ही कार्यालये खालील ठिकाणी आहेत. अहमदाबाद, बेंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुवनंतपुरम.

Indian Currency Notes
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.