Mutual Fund
Top 10 Mutual FundSakal

Mutual Fund: 10 म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना बनवले लखपती; तुम्ही गुंतवणूक केली का?

Top 10 Mutual Fund: निफ्टी आणि सेन्सेक्सने 1 ऑगस्ट रोजी शेअर बाजारात नवा विक्रमी उच्चांक गाठला. निफ्टीने प्रथमच 25,000 चा टप्पा पार केला, तर सेन्सेक्सने प्रथमच 82,000 चा स्तर गाठला. निफ्टीला 25,000 अंकांपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 29 वर्षे लागली.
Published on

Top 10 Mutual Fund: निफ्टी आणि सेन्सेक्सने 1 ऑगस्ट रोजी शेअर बाजारात नवा विक्रमी उच्चांक गाठला. निफ्टीने प्रथमच 25,000 चा टप्पा पार केला, तर सेन्सेक्सने प्रथमच 82,000 चा स्तर गाठला. निफ्टीला 25,000 अंकांपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 29 वर्षे लागली.

या कालावधीत त्याचा चक्रवाढ वार्षिक परतावा 13.4 टक्के आहे. गेल्या काही वर्षांत बाजारातील तेजीचा फायदा म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनीही घेतला आहे. कोणत्या 10 म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले ते पाहूया.

1. पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंड

28 मे 2013 रोजी हा फंड सुरू करण्यात आला. हा फ्लेक्सी कॅप फंड आहे. याचा अर्थ कमी आणि जास्त बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये हा फंड गुंतवणूक करतो.

त्याचा 5 वर्षांचा आणि 10 वर्षांचा CAGR परतावा अनुक्रमे 26 टक्के आणि 18.4 टक्के आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी या फंडात 10,000 रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली असती तर आज तुम्हाला 35.6 लाख रुपये मिळाले असते.

2. HDFC मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंड

हा फंड 25 जून 2007 रोजी सुरू झाला. हा मिडकॅप फंड आहे. याचा अर्थ हा फंड फक्त मिडकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. 5 वर्ष आणि 10 वर्षात त्याचा CAGR परतावा अनुक्रमे 30.7 टक्के आणि 20.7 टक्के आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी या फंडात 10,000 रुपयांची मासिक SIP सुरू केली असती तर आज तुम्हाला 39.8 लाख रुपये मिळाले असते.

3. ICICI प्रुडेन्शियल ब्लूचिप फंड

हा फंड 23 मे 2008 रोजी सुरू करण्यात आला. हा लार्जकॅप फंड आहे. याचा अर्थ हा फंड फक्त लार्ज कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. 5 वर्ष आणि 10 वर्षांमध्ये त्याचा CAGR परतावा अनुक्रमे 21.6 टक्के आणि 15.5 टक्के आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी या फंडात 10,000 रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली असती तर आज तुम्हाला पैसे 30.5 लाख रुपये मिळाले असते.

4. एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंड

हा फंड 1 जानेवारी 1995 रोजी सुरू करण्यात आला. हा फ्लेक्सिकॅप फंड आहे. 5 वर्ष आणि 10 वर्षात त्याचा CAGR परतावा अनुक्रमे 23.5 टक्के आणि 16.1 टक्के आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी या फंडात 10,000 रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली असती तर आज तुम्हाला 33.7 लाख रुपये मिळाले असते.

5. निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड

हा फंड 16 सप्टेंबर 2010 रोजी सुरू करण्यात आला. हा स्मॉलकॅप फंड आहे. याचा अर्थ हा फंड फक्त स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. 5 वर्ष आणि 10 वर्षात त्याचा CAGR परतावा अनुक्रमे 38.1 टक्के आणि 25.3 टक्के आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी या फंडात 10,000 रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली असती तर आज तुम्हाला 51.2 लाख रुपये मिळाले असते.

6. कोटक फेक्सिकॅप फंड

हा फंड 23 मे 2008 रोजी सुरू करण्यात आला. हा लार्जकॅप फंड आहे. याचा अर्थ हा फंड फक्त लार्ज कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. 5 वर्ष आणि 10 वर्षात त्याचा CAGR परतावा अनुक्रमे 21.6 टक्के आणि 15.5 टक्के आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी या योजनेत 10,000 रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली असती तर आज तुम्हाला 30.5 लाख रुपये मिळाले असते.

7. एसबीआय ब्लूचिप फंड

हा फंड 20 जानेवारी 2006 रोजी सुरू झाला. हा ब्लू चिप फंड आहे. याचा अर्थ हा फंड फक्त ब्लू चिप कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. 5 वर्ष आणि 10 वर्षात त्याचा CAGR परतावा अनुक्रमे 18.9 टक्के आणि 14.8 टक्के आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी या फंडात 10,000 रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली असती तर आज तुम्हाला 27.1 लाख रुपये मिळाले असते.

8. कोटक इमर्जिंग इक्विटी फंड

हा फंड 30 मार्च 2007 रोजी सुरू करण्यात आला. 5 वर्ष आणि 10 वर्षात त्याचा CAGR परतावा अनुक्रमे 29.7 टक्के आणि 21.5 टक्के आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी या फंडात 10,000 रुपयांची मासिक SIP सुरू केली असती तर आज तुम्हाला 39 लाख रुपये मिळाले असते.

Mutual Fund
Silver Price: चांदीला येणार सोन्याचे दिवस! भाव एक लाख रुपयांच्या पुढे जाणार, काय आहे कारण?

9. ICICI प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंड

हा फंड 16 ऑगस्ट 2004 रोजी सुरू झाला. 5 वर्ष आणि 10 वर्षात त्याचा CAGR परतावा अनुक्रमे 26.7 टक्के आणि 17.4 टक्के आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी या फंडात 10,000 रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली असती तर आज तुम्हाला 34.6 लाख रुपये मिळाले असते.

10. मिराए ॲसेट लार्ज कॅप फंड

हा फंड 4 एप्रिल 2008 रोजी सुरू करण्यात आला. हा लार्जकॅप फंड आहे. याचा अर्थ हा फंड फक्त लार्ज कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. 5 वर्ष आणि 10 वर्षात त्याचा CAGR परतावा अनुक्रमे 17.6 टक्के आणि 15.3 टक्के आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी या फंडात 10,000 रुपयांची मासिक SIP सुरू केली असती तर आज तुम्हाला 27 लाख रुपये मिळाले असते.

Mutual Fund
Tata Sons: टाटांचा प्लॅन RBIने मान्य केला नसता तर.., शेअर बाजारच नव्हे तर अर्थव्यवस्थेतही उडाला असता गोंधळ

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.