Israel-Hamas War: इस्राइलशी लढायला हमासकडे इतका पैसा येतो कुठून? असं आहे जागतिक नेटवर्क

Israel-Hamas War: इस्राइलने हल्ले सुरु केल्यापासून गाझा पट्टीतील दहा लाखांहून अधिक जणांना आपले घर सोडून निघून जावे लागले आहे.
Who funds Hamas? A global network of crypto, cash and charities know details
Who funds Hamas? A global network of crypto, cash and charities know details Sakal
Updated on

Israel-Hamas War: पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमास आणि इस्राइल यांच्यात युद्ध चालू आहे. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी हमासने इस्रायलच्या दिशेने सुमारे 5,000 रॉकेट सोडले. यानंतर इस्राइलने हमासविरोधात युद्धाची घोषणा केली.

इस्राइलने हल्ले सुरु केल्यापासून गाझा पट्टीतील दहा लाखांहून अधिक जणांना आपले घर सोडून निघून जावे लागले आहे. इस्राइलने गाझा पट्टीचा वीज, पाणी आणि इंधन यांचा पुरवठा थांबविला असून युद्धामुळे अन्नाचाही तुटवडा आहे. त्यामुळे स्थलांतरितांना पाण्याची आणि अन्नाची प्रचंड कमतरता भासत आहे. 

हमास संघटना काय आहे?

इस्राइशी वैर असलेली हमास ही पॅलेस्टाईनची इस्लामिक अतिरेकी संघटना आहे. शेख अहमद यासीन यांनी 1987 च्या जनआंदोलनात या संघटनेची पायाभरणी केली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत हमास इस्रायलला पॅलेस्टिनी भागातून हटवण्यासाठी झगडत आहे. गाझा पट्टीतून काम करणाऱ्या हमासला इस्राइलला हा देश म्हणून मान्य नाही.

हमासला आर्थिक मदत कशी मिळते?

हमाससारखी दहशतवादी संघटना इस्राइलसारख्या बलाढ्य देशाशी कशी स्पर्धा करते? तर हमासला अनेक देशांकडून आर्थिक मदत मिळत असली तरी त्याला पाठिंबा देणाऱ्या देशांच्या यादीत इराण आणि तुर्कस्तानचे नाव अग्रस्थानी आहे.

इराण दीर्घकाळापासून हमासला आर्थिक ताकद आणि लष्करी शस्त्रे पुरवून पाठिंबा देत आहे. या शस्त्रांमध्ये प्राणघातक क्षेपणास्त्रांचाही समावेश आहे. अहवालानुसार, हमासला आखाती आणि काही पाश्चात्य देशांकडून पैसे मिळतात.

Who funds Hamas? A global network of crypto, cash and charities know details
34 देशांमध्ये समलैंगिक विवाहाला मान्यता तर पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये थेट मृत्यूची शिक्षा

परदेशातून येणारा पैसा पॅलेस्टिनी राष्ट्रीय प्राधिकरणांद्वारे हमासला दिला जातो, हमासचे गाझा पट्टीवर संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण आहे. याशिवाय गुप्त मार्ग आणि बोगद्यांद्वारे आणल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर लादलेल्या करातूनही हमासला मोठा निधी मिळतो.

सीएफआरच्या अहवालानुसार या कराच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 100 कोटी रुपये दिले जातात. इराण आणि तुर्कस्तान व्यतिरिक्त सीरिया देखील हमासचा समर्थक आहे आणि त्याला मदत करण्यासाठी नेहमीच पुढे असतो.

Who funds Hamas? A global network of crypto, cash and charities know details
Adani Group: अदानी समूहाची पहिल्यांदाच खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर टीका; म्हणाले, आमची प्रतिमा...

युनायटेड स्टेट्स आणि ब्रिटन सारख्या देशांनी हमासला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. हमासने वाढते आंतरराष्ट्रीय निर्बंध टाळण्यासाठी क्रिप्टोकरन्सी, क्रेडिट कार्ड्सचा वापर करुन आर्थिक मदत मिळवली आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, इस्राइल सरकारने आपल्या तपासात हमासला निधी पुरवण्यात क्रिप्टोकरन्सीची महत्त्वाची भूमिका असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर इस्राइलने आता हमासची क्रिप्टो खाती जप्त केली आहेत.

अहवालानुसार, अतिरेकी संघटना हमासने मोठ्या प्रमाणावर क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवून या हल्ल्यासाठी निधी गोळा केला होता. इस्राइलने हमासची सर्व क्रिप्टो खाती गोठवली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.