Who is Bhavesh Bhandari: गुजरातमधील एका श्रीमंत जैन जोडप्याने सुमारे 200 कोटी दान केले आहेत आणि त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारीमध्ये, भावेश भंडारी आणि त्यांच्या पत्नीने एका कार्यक्रमात त्यांची सर्व मालमत्ता दान केली. अहवालानुसार, या महिन्याच्या शेवटी, सर्व संपत्ती दान करुन संन्यासी जीवन जगण्याचा त्यांचा हेतू आहे असे त्यांनी सांगितले.
1. एबीपीच्या वृत्तानुसार, भावेश भंडारी हे गुजरातचे रहिवासी असून ते साबरकांठा येथील एका श्रीमंत कुटुंबातून आहेत.
2. त्यांनी बांधकाम उद्योगात काम केले आणि साबरकांठा आणि अहमदाबाद या दोन्ही ठिकाणी त्यांनी बांधकाम प्रकल्पांचे व्यवस्थापन केले.
3. भंडारी आणि त्यांच्या पत्नीने 200 कोटी दान केले आणि दीक्षा घेण्याचा मार्ग निवडला.
4. भंडारी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे, त्यांनी 2022 मध्ये दीक्षा घेतली.
5. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने दिक्षा घेतल्याने ते सर्व साधे जीवन जगत आहेत आणि त्यांनी अगदी एअर कंडिशनर, पंखे, बेड या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर सर्व गोष्टींचा त्याग केला आहे.
6. दीक्षा समारंभासाठी त्यांची मिरवणुक काढण्यात आली. हिम्मतनगरमध्ये निघालेल्या मिरवणुकीत मोठी गर्दी झाली होती. 22 एप्रिल रोजी भंडारी दाम्पत्य संन्यासी होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.
22 एप्रिल रोजी शपथ घेतल्यानंतर, जोडप्याला सर्व कौटुंबिक संबंध तोडावे लागतील आणि कोणत्याही 'भौतिक वस्तू' ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही. यानंतर ते संपूर्ण भारतभर अनवाणी फिरतील आणि केवळ भिक्षेवर ते जगतील. त्यांना फक्त दोन पांढरे कपडे, भिक्षेसाठी वाटी ठेवण्याची परवानगी असेल.
भावेश भंडारी यांच्या पूर्वी गुजरातच्या एका नऊ वर्षांच्या मुलीने, जी एका श्रीमंत हिरे व्यापाऱ्याची मुलगी आहे, तिने भौतिक सुखसोयी सोडून संन्यास घेतला आहे.
धनेश आणि अमी संघवी यांची मोठी मुलगी देवांशी हिने सुरतच्या वेसू भागात जैन साधू आचार्य विजय कीर्तियशसुरी यांच्यासह शेकडो लोकांसमोर दीक्षा घेतली. तिच्या वडिलांकडे संघवी अँड सन्स ही सुरत स्थित डायमंड पॉलिशिंग आणि एक्सपोर्ट कंपनी आहे जी सुमारे तीस वर्षांपासून व्यवसायात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.