Who is Kunal Gupta: लोकप्रिय सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्सच्या गुंतवणुकीसह अनेक स्टार्टअप्स भारतात सुरू झाले आहेत. स्टार क्रिकेटर एमएस धोनीने एका स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे आणि या कंपनीच्या ब्रँडची जाहीरातही केली आहे. धोनीने गुंतवणूक केलेली कंपनी या वर्षी ऑगस्टमध्ये रावेत, पुणे येथे गिगाफॅक्टरी सुरु करणार आहे.
धोनीने इमोटोराड या इलेक्ट्रिक वाहन कंपनीमध्ये गेल्या महिन्यात गुंतवणूक केली आहे. इमोटोरॅड ही कंपनी दक्षिण आशियातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक सायकल निर्मिती प्रकल्प उभारत आहे.
ही कंपनी ज्यांनी सुरु केली आहे त्या कंपनीचे संस्थापक आहेत कुणाल गुप्ता. ते EMotorad चे सह-संस्थापक आणि CEO आहेत. त्यांनी राजीव गंगोपाध्याय, आदित्य ओझा आणि सुमेध बत्तेवार यांच्यासमवेत 2020 मध्ये कंपनीची स्थापना केली. EMotorad चा भारतातील एकूण ई-सायकल मार्केटमध्ये 65 टक्के वाटा असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
कुणाल यांना मोबिलिटी क्षेत्रातील सात वर्षांचा अनुभव आहे. दैनंदिन प्रवास करण्यासाठी परवडणाऱ्या किमतीत इबाईक आणण्याचा त्यांची EMotorad कंपनी प्रयत्न करत आहे.
त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून अभियांत्रिकी (B.E) पदवी प्राप्त केली. नंतर, त्यांनी NICMAR विद्यापीठातून वित्त व्यवस्थापन सेवांमध्ये पीजीडीएम केले. त्यांनी व्हार्टन एक्झिक्युटिव्ह एज्युकेशनचा एक वर्षाचा कोर्सही केला आहे.
लहानपणापासूनच कुणाल गुप्ता यांना नवीन गोष्टी करण्यात रस होता. सातव्या इयत्तेत असताना त्यांनी ग्रीटिंग कार्डचे पहिले स्टार्टअप सुरु केले होते. यापूर्वी दोन स्टार्टअप्समधून यशस्वीरित्या बाहेर पडल्यानंतर, गुप्ता यांनी EMotorad कंपनीत लक्ष घातले आहे.
याशिवाय, EMotorad 2,40,000-स्क्वेअर फुटमध्ये 5,00,000 ई-सायकल बनवणार आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी त्याचे उद्घाटन होणार आहे. eMotorrad च्या या Gigafactory मध्ये, बॅटरी, मोटर, डिस्प्ले आणि चार्जरसह इलेक्ट्रिक वाहन (EV) मध्ये वापरलेले जवळजवळ सर्व घटक तयार केले जातील.
कंपनीच्या कारखान्यात सध्या 250 लोक काम करत असून येत्या काळात 300 नवीन लोकांची भरती होणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचे बांधकाम चार टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.