Who Is Madhavi Buch: मुंबईची कन्या ते 'सेबी'च्या पहिल्या महिला अध्यक्षा; कोण आहेत हिंडेनबर्गने आरोप केलेल्या माधवी बुच

Hindenburg: माधवी बुच अवघ्या 18 वर्षांच्या असताना त्यांचे लग्न धवल बुच यांच्याशी ठरवण्यात आले होते. त्यांचे पती धवल बहुराष्ट्रीय कंपनी युनिलिव्हरमध्ये संचालक होते.
Who is Madhavi Buch
Who is Madhavi BuchEsakal
Updated on

SEBI Chairperson: अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने आपल्या नवीन अहवालात शेअर बाजार नियामक सेबीच्या प्रमुख माधवी बुच यांच्यावर हल्ला केला आहे. एका ब्लॉग पोस्टमध्ये हिंडेनबर्गने सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच यांच्यावर आरोप केला आहे की, माधवी यांचा अदानींच्या गुंतवणूक निधीमध्येही हिस्सा आहे.

अदानी समूहाविरुद्धचा अहवाल येऊन १८ महिने उलटून गेल्यानंतरही सेबीने तपासात रस दाखवला नसल्याचा आरोप हिंडेनबर्ग यांनी केला आहे. मॉरिशसमधील अदानी समूहाच्या नेटवर्कची संपूर्ण माहिती दिल्यानंतरही कोणतीही कारवाई केली जात नाही.

गुप्त कागदपत्रांचा हवाला देत हिंडेनबर्गने म्हटले आहे की, सेबीच्या अध्यक्षा आणि त्यांचे पती धवल बुच यांची अदानींच्या परदेशातील शेल कंपन्यांमध्ये भागीदारी होती. या कंपन्या अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे मोठे बंधू विनोद अदानी चालवतात.

कोण आहेत माधवी बुच?

1966 मध्ये जन्मलेल्या सेबीच्या पहिला महिला प्रमुख माधवी बुच या मुंबईत लहाणाच्या मोठ्या झाल्या. त्यांचे वडील कमल पुरी कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत होते तर त्यांच्या आईने राज्यशास्त्रात डॉक्टरेट मिळवली होती.

माधवी बुच अवघ्या 18 वर्षांच्या असताना त्यांचे लग्न धवल बुच यांच्याशी ठरवण्यात आले होते. त्यांचे पती धवल बहुराष्ट्रीय कंपनी युनिलिव्हरमध्ये संचालक होते. जेव्हा त्या 21 वर्षांच्या झाल्या तेव्हा त्यांचा विवाह पार पडाला. लग्नानंतर माधवी यांनी आपल्या करिअरला गांभीर्याने घेत मोठी झेप घेतली.

Who is Madhavi Buch
Hindenberg :'सेबी' काय लपवतेय? हिंडेनबर्गच्या आरोपानंतर एक्स अकाउंट केलं लॉक?

शिक्षण आणि करिअर

माधवी पुरी बुच यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अहमदाबाद येथून एमबीएची पदवी आणि सेंट स्टीफन कॉलेज, नवी दिल्ली येथून गणित विषयात बॅचलर पदवी घेतली आहे.

बुच यांनी शांघायमधील न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सल्लागार आणि ग्रेटर पॅसिफिक कॅपिटल या खाजगी इक्विटी फर्मच्या सिंगापूर कार्यालयाचे प्रमुख म्हणून काम केले आहे. यासह त्यांनी ICICI सिक्युरिटीज लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि ICICI बँकेच्या बोर्डावर कार्यकारी संचालक म्हणूनही काम केले.

बुच यांनी अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर बिगर कार्यकारी संचालक म्हणूनही काम केले आहे.

Who is Madhavi Buch
Hindenburg 2.0 : सेबीच्या अध्यक्षांचाच अदानींच्या घोटाळ्यात हात! हिंडेनबर्गच्या नव्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

सेबीतील कार्यकाळ

माधवी पुरी बुच या केवळ सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्षाच नाहीत, तर या पदापर्यंत पोहोचणाऱ्या त्या खासगी क्षेत्रातील पहिल्या व्यक्ती आहेत, ज्या सेबीच्या प्रमुख झाल्या आहेत. त्यांच्या आधी हे पद कोणत्याही महिलेने भूषवलेले नाही.

माधबी पुरी बुच यांची मार्च 2022 मध्ये सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी अजय त्यागी यांची जागा घेतली. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने तीन वर्षांच्या कालावधीसाठी माधबी पुरी बुच यांची सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ 2025 मध्ये संपणार आहे.

उल्लेखनीय आहे की माधबी पुरी बुच यांनी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) चे पूर्णवेळ सदस्य म्हणून काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.