Poorest politicians of india, MLA: देशातील बहुतांश नेत्यांकडे लाखो आणि करोडो रुपयांची संपत्ती आहे. सामान्य माणसासारखे जीवन जगणारे नेते देशात फारच कमी आहेत. आपल्या देशात, राजकारणी नेता म्हणले की, आलिशान घर, कार आणि मालमत्ता असा सर्वसामान्य लोकांचा अंदाज असतो. नेत्यांच्या संपत्तीबद्दल अनेकदा चर्चा होते, पण सामान्य जीवन जगणाऱ्या आणि चर्चेत कमी असणाऱ्या नेत्यांबद्दल फारच कमी बोलले जाते. आज आम्ही तुम्हाला अशा नेत्यांबद्दल सांगणार आहोत जे सर्वात गरीब आहेत.
LiveMint च्या अहवालानुसार, असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने 2023 मध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात 28 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील 4001 आमदारांचे विश्लेषण करण्यात आले होते. यानंतर भारतीय आमदारांच्या संपत्तीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. नेत्यांच्या संपत्तीशी संबंधित हे आकडे 2019, 2021, 2022 आणि 2023 या वर्षांचे आहेत आणि नेत्यांनी स्वतः ही संपत्ती जाहीर केली आहे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल की, भारतात असा एक आमदार आहे ज्याच्याकडे फक्त 1700 रुपये आहेत. होय, भाजपचे आमदार निर्मल कुमार धारा यांच्याकडे केवळ 1,700 रुपयांची संपत्ती आहे. ओडिशाचे अपक्ष आमदार मकरंद मुदुली दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे एकूण संपत्ती 15 हजार रुपये आहे.
पंजाबमधील आम आदमी पक्षाचे आमदार नरिंदर पाल सिंग यांची एकूण संपत्ती 18,370 रुपये आहे. आपचे आमदार नरिंदर कौर भाराज यांच्याकडे एकूण 24,409 रुपयांची मालमत्ता आहे. JMM आमदार मंगल कालिंदी यांची एकूण संपत्ती 30,000 रुपये आहे.
एडीआरच्या अहवालानुसार, राम कुमार यादव, अनिल कुमार, अनिल प्रधान, राम डोंगरे आणि विनोद भिवा निकोले हे देखील या आमदारांच्या यादीत आहेत ज्यांची संपत्ती खूपच कमी आहे.
एडीआरच्या अहवालानुसार, मे 2023 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचंड विजयानंतर उपमुख्यमंत्री होणारे डीके शिवकुमार हे सर्वात श्रीमंत नेते आहेत आणि त्यांच्याकडे सुमारे 1,500 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.