Bloomberg Billionaires Index: भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनी 2023 मध्ये कमाईच्या बाबतीत बड्या उद्योगपतींना मागे टाकले आहे. ओ.पी. जिंदाल समूहाच्या अध्यक्षांच्या संपत्तीत 9.6 अब्ज डॉलरची मोठी वाढ झाली आहे.
अंबानी आणि बिर्ला यांसारख्या दिग्गजांच्या संपत्तीतील वाढीपेक्षा सावित्री जिंदाल यांच्या संपत्तीत जास्त वाढ झाली आहे. एकीकडे त्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाल्याचा आनंदोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे त्यांच्या कुटुंबावर संकटाचे ढग दाटत आहेत.
मुंबई पोलिसांनी सावित्री जिंदाल यांचा मुलगा आणि जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
पती ओमप्रकाश जिंदाल यांच्या निधनानंतर सावित्री जिंदाल यांनी जिंदाल समूहाची जबाबदारी स्वीकारली. कोरोना काळात सावित्री जिंदाल यांच्या संपत्तीत सुमारे पन्नास टक्क्यांची घट झाली होती. त्यावेळी झालेल्या प्रचंड नुकसानीनंतरही त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे आणि आज त्यांनी जिंदाल ग्रुपला एका नव्या उंचीवर नेले आहे.
जिंदाल समूहामध्ये JSW स्टील, जिंदाल स्टील अँड पॉवर, JSW एनर्जी, जिंदाल सॉ, जिंदाल स्टेनलेस आणि गुंतवणूक कंपनी JSW होल्डिंग यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. ओपी जिंदाल ग्रुपकडे पोर्ट ऑपरेटर JSW इन्फ्रास्ट्रक्चरची 83% मालकी आहे जी या वर्षी ऑक्टोबरमध्ये शेअर बाजारात लिस्ट झाली.
मुकेश अंबानींची संपत्ती किती वाढली?
ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे (RIL) चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये सुमारे 5 बिलियन डॉलरची वाढ झाली. त्यांची एकूण संपत्ती 92.3 अब्ज डॉलर्स आहे.
कोण आहेत सावित्री जिंदाल?
- सावित्री जिंदाल या स्टील किंग ओपी जिंदाल यांच्या पत्नी आणि माजी खासदार नवीन जिंदाल यांच्या आई आहेत.
- सावित्री जिंदाल 350 कोटी डॉलर्सच्या मालमत्तेच्या मालक आहेत. त्यांचा जन्म 20 मार्च 1950 रोजी हरियाणातील हिसार येथील तिनसुकिया येथे झाला.
- जिंदाल ग्रुपच्या नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरपर्सन सावित्री जिंदाल 2005 मध्ये हेलिकॉप्टर अपघातात पतीचा मृत्यू झाल्यापासून ग्रुपच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
- ओपी जिंदाल हिसारमधून आमदारही राहिले आहेत. 2005 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर सावित्री जिंदाल यांनी हिस्सारच्या राजकारणात प्रवेश केला आणि त्या आमदार झाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.