Who Pays The Highest Tax In India:
देशात आयकर रिटर्न भरण्याचा महिना चालू आहे. आता त्याची मुदतही अगदी जवळ आली आहे. बर्याच लोकांनी आत्तापर्यंत त्यांचे आयकर रिटर्न भरले असेल किंवा ते भरणार असतील.
आयकर रिटर्न भरण्याच्या या प्रक्रियेत तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की देशात सर्वाधिक आयकर कोण भरतं? तुम्हाला वाटत असेल की अंबानी-अदानी किंवा टाटा-बिर्ला... यापैकी कोणतरी सर्वात जास्त कर देत असेल. तुम्हीही असा विचार करत असाल तर तो चुकीचा आहे.
गेल्या वर्षी इतका आयकर जमा झाला
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार हा गेल्या वर्षभरात म्हणजेच 2021-22 या आर्थिक वर्षात भारतातील सर्वात मोठा करदाता होता. चित्रपट अभिनेता अक्षय कुमारने 2022 मध्ये 29.5 कोटी रुपये आयकर जमा केला होता. त्याने आपली वर्षभराची कमाई 486 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते.
अक्षय कुमारच्या कमाईचा हा आकडा आश्चर्यचकित करणारा नाही. तो बॉलीवूडमधील सर्वात मोठ्या स्टार्समध्ये गणला जातो आणि सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.
त्याशिवाय अक्षय कुमार स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आणि स्पोर्ट्स टीम चालवतो. विविध ब्रँड्स मधूनही तो भरपूर कमाई करतो.
हेच कारण आहे की त्याची कमाई जास्त आहे आणि वैयक्तिक आयकर भरण्याच्या बाबतीत तो भारतात नंबर-1 आहे. अक्षय कुमार 2022 पूर्वीही आयकर भरण्यात नंबर-1 होता.
2021 मध्ये म्हणजेच 2020-21 या आर्थिक वर्षासाठी त्यांनी 25.5 कोटी रुपये आयकर जमा केला होता. त्या वर्षी तो देशातील सर्वात मोठा करदाता होता. त्यासाठी अक्षय कुमारला 'सन्मान पत्र' पुरस्कार देण्यात आला.
यावेळी कोण?
सध्या तरी आयकर विभागाने सर्वात मोठ्या करदात्याबद्दल सांगितले नाही. मात्र, ABP News ने दिलेल्या वृत्तानुसार माजी क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे नाव यात आहे.
महेंद्रसिंग धोनीने 2022-23 या आर्थिक वर्षात 38 कोटी रुपयांचा आयकर जमा केला आहे. धोनी गेल्या अनेक वर्षांपासून झारखंडचा सर्वात मोठा आयकर भरणारा व्यक्ती आहे. आता या वर्षीही तो देशात नंबर-1 असल्याचं दिसत आहे.
यामुळे अंबानी-अदानी नंबर-1 नाहीत
आता एका वर्षात असा प्रश्न पडू शकतो की जास्तीत जास्त कर भरण्याच्या बाबतीत अंबानी-अदानी किंवा टाटा-बिर्ला का पुढे नाहीत? तर याचे उत्तर असे की, बहुतांश व्यावसायिकांकडे वैयक्तिक मालमत्ता नसून त्यांच्या कंपन्यांच्या नावावर मालमत्ता आहे. अशा परिस्थितीत, त्यांची कमाई देखील त्यांच्या कंपन्यांच्या वाट्याला जाते, ज्याच्या बदल्यात कॉर्पोरेट कर भरला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.