प्राप्तिकर विवरणपत्र कोणी भरावे?

करदात्यांना आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी (आकारणी वर्ष २०२४-२५) प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे.
Who should file income tax return
Who should file income tax returnsakal
Updated on

- अॅड.सुकृत देव

करदात्यांना आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी (आकारणी वर्ष २०२४-२५) प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे. हे विवरणपत्र भरणे ज्यांना अनिवार्य आहे, ज्यांनी भरणे हिताचे आहे आणि ज्यांना भरणे ऐच्छिक आहे, अशा सर्वांनी भरणे गरजेचे आहे.

विवरणपत्र भरण्याची गरज

करदात्यांनी निवड केलेल्या (जुनी किंवा नवी) करप्रणालीनुसार, वार्षिक करपात्र उत्पन्न स्लॅब रेटप्रमाणे जास्त असेल, तर करविवरणपत्र भरणे अनिवार्य आहे. जुन्या करप्रणालीनुसार, वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांहून अधिक; पण कलम ८७ (अ) रिबेटद्वारे पाच लाख रुपयांहून कमी आहे, तर नव्या करप्रणालीनुसार, वार्षिक उत्पन्न तीन लाखांहून अधिक; पण कलम ८७ (अ) रिबेटद्वारे सात लाखांपेक्षा कमी आहे, अशा वेळी विवरणपत्र भरणे हिताचे आहे.

अनेक प्राप्तिकरदाते या भ्रमात असतात, की त्यांचे वार्षिक करपात्र उत्पन्न कमी असल्याने, विवरणपत्र दाखल करण्याची गरज नाही. मात्र, त्यांना कर्ज काढायचे असल्यास, किमान दोन ते तीन वर्षांच्या विवरणपत्रांची गरज भासते. त्यामुळे विवरणपत्र दाखल करणे आवश्‍यक आहे.

ज्या करदात्यांनी आर्थिक वर्षात अनेक व्यवहार केले आहेत. परदेशातील घरातून मिळणारे भाडे किंवा परदेशी कंपन्यांच्या शेअरमधील गुंतवणुकीतून मिळणारे व्याज आदी, असे उत्पन्न मिळत असल्यास, विवरणपत्र भरणे आवश्यक आहे.

प्राप्तिकर विभागाने नमूद केल्याप्रमाणे अ) करदात्याने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा भरणा, एका किंवा त्याहून अधिक चालू खात्यात जमा केले असल्यास,

ब) परदेशवारीसाठी दोन लाख रुपयांहून अधिक खर्च केला असल्यास,

क) वीजबिल भरणा एक लाख रुपयांहून अधिक केला असल्यास, करविभागाकडून विचारणा (declaration) होते, त्यामुळे विवरणपत्र भरणे हिताचे आहे.

करदात्याचे ‘टीडीएस’ (कापून भरलेला प्राप्तिकर) व ‘टीसीएस’ (गोळा करून भरलेला प्राप्तिकर) हे करमुक्त उत्पन्न असून, ते कापले गेले असल्यास, परतावा मिळण्यासाठी विवरणपत्र वेळेत दाखल करणे आवश्यक आहे.

कलम १९४ पी नुसार ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय ७५ वर्षांपेक्षा कमी आहे आणि त्यांना निवृत्तिवेतन व व्याजाव्यतिरिक्त अन्य उत्पन्न असल्यास, किंवा एकाहून अधिक बँकांमधून करपात्र व्याज येत असल्यास, तसेच या व्यतिरिक्त करपात्र उत्पन्न, व्यवहार, व्याज, करकपात, भांडवली लाभ आदी महत्त्वाच्या बाबी असल्यास, अशा करदात्यांनी विवरणपत्र वेळेत भरणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com