Wholesale Inflation
Wholesale Inflation DataSakal

WPI Inflation: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका; घाऊक महागाई दर 15 महिन्यांच्या उच्चांकावर

Wholesale Inflation Data: देशात घाऊक महागाई दरात वाढ झाली असून ती 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. घाऊक महागाई दर मे 2024 मध्ये 2.61 टक्क्यांवर आला आहे, तर मागील महिन्यात म्हणजेच एप्रिल 2024 मध्ये घाऊक महागाई दर 1.26 टक्के होता.
Published on

Wholesale Inflation Data: देशात घाऊक महागाई दरात वाढ झाली असून ती 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. घाऊक महागाई दर मे 2024 मध्ये 2.61 टक्क्यांवर आला आहे, तर मागील महिन्यात म्हणजेच एप्रिल 2024 मध्ये घाऊक महागाई दर 1.26 टक्के होता.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, "मे 2024 मध्ये महागाई वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे खाद्यपदार्थांच्या किमती, खाद्यपदार्थांचे उत्पादन, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, खनिज तेल, इतर उत्पादनांच्या किमती वाढणे हे आहे''

Wholesale Inflation
IT Sector: आयटी क्षेत्रावर मंदीचे सावट! मोठ्या कंपन्यांमध्ये 10,000 फ्रेशर्स ऑनबोर्डिंगच्या प्रतीक्षेत

आकडेवारीनुसार, मे महिन्यात खाद्यपदार्थांची महागाई 9.82 टक्क्यांनी वाढली, तर एप्रिलमध्ये ती 7.74 टक्के होती. मे महिन्यात भाज्यांच्या महागाईचा दर 32.42 टक्के होता, तो एप्रिलमध्ये 23.60 टक्के होता. कांद्याचा महागाई दर 58.05 टक्के, तर बटाट्याचा महागाई दर 64.05 टक्के होता. मे महिन्यात डाळींच्या महागाईचा दर 21.95 टक्के होता.

Wholesale Inflation
Adani Group: अदानी समूहाने पेन्ना सिमेंट कंपनी घेतली विकत; 10 हजार कोटींना झाली डील, श्रीलंकेतही करणार प्रवेश

या आठवड्याच्या सुरुवातीला जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात किरकोळ महागाई दर 4.75 टक्क्यांवर घसरला, जो एका वर्षातील नीचांकी पातळीवर आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चलनविषयक धोरण तयार करताना प्रामुख्याने किरकोळ महागाईचा विचार करते. या महिन्याच्या सुरुवातीला, RBI ने सलग आठव्यांदा व्याजदर अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.