Prasar Bharati: प्रसार भारती सुरू करणार स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म; स्ट्रीमिंग ॲप्स चिंतेत, काय आहे कारण?

Prasar Bharati OTT Platform: सरकारी मालकीची टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर स्वतःचे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. प्रसार भारतीने खाजगी प्रसारकांना ईमेलमध्ये ही माहिती दिली आहे. त्यामुळे खाजगी प्रसारकांच्या व्यवसायावर या निर्णयाचा मोठा परिणाम होणार आहे.
Prasar Bharati OTT Platform
Prasar Bharati OTT PlatformSakal

Prasar Bharati OTT Platform: सरकारी मालकीची टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर स्वतःचे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. प्रसार भारतीने खाजगी प्रसारकांना ईमेलमध्ये ही माहिती दिली आहे. त्यामुळे खाजगी प्रसारकांच्या व्यवसायावर या निर्णयाचा मोठा परिणाम होणार आहे.

प्रसार भारतीने प्रस्तावित OTT प्लॅटफॉर्मवर स्पोर्ट्स चॅनेल प्रदर्शित केले जातील की नाही हे स्पष्टपणे सांगितलेले नाही. खाजगी प्रसारकांना अशी भीती आहे की स्पोर्ट्स चॅनेल प्रसार भारतीने दाखवले तर त्यांच्या व्यवसायाला मोठा फटका बसू शकतो.

इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत एका अधिकाऱ्याने सांगितले की, स्पोर्ट्स प्रसारणाचे हक्क मोठ्या किमतींना विकले जातात. साहजिकच, ते वितरित केलेल्या रेटिंग पॉईंटवर जाहिरातीद्वारे मोठी कमाई केली जाते. जर स्पोर्ट्स चॅनेल प्रसार भारतीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विनामूल्य दाखवले तर जाहिरातीद्वारे जास्त कमाई करता येणार नाही.

Prasar Bharati OTT Platform
Share Market Opening: शेअर बाजाराने रचला नवा इतिहास, सेन्सेक्सने प्रथमच पार केला 80 हजारांचा टप्पा

2022 मध्ये, डिस्ने स्टारने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) स्पर्धांसाठी चार वर्षांच्या हक्कांसाठी (2024-2027) 3 अब्ज डॉलर देण्याचे मान्य केले होते. तर Viacom18 ने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाद्वारे (BCCI) चालवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामन्यांसाठी 5,963 कोटींचे माध्यम हक्क पुढील पाच वर्षांसाठी विकत घेतले आहेत. प्रसार भारतीच्या OTT प्लॅटफॉर्मचा उद्देश बातम्या, मनोरंजन आणि स्पोर्ट्स कंटेंट तयार करणे आहे.

व्हायाकॉम18 आणि डिस्ने स्टार हे दोन प्लॅटफॉर्म सध्या मोबाईल युजरसाठी OTT ॲप्सवर विनामूल्य स्पोर्ट्स स्ट्रीमिंग करत आहेत. जर डीडीने ओटीटीवर स्पोर्ट्स चॅनेल विनामुल्य दाखवले तर खाजगी प्रसारकांना कोणीही पैसे देणार नाही.

Prasar Bharati OTT Platform
2000 Rupee Note: दोन हजार रुपयांच्या इतक्या नोटा अजूनही बाजारात; आरबीआयने दिली नवीन माहिती

2022 च्या अधिसूचनेमध्ये, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व ऑलिंपिक खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई खेळ आणि क्रिकेट, टेनिस, हॉकी, फुटबॉल, बॅडमिंटन, कबड्डी आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघांद्वारे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांना केंद्र सरकारने राष्ट्रीय महत्त्वाचे खेळ म्हणून मान्यता दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com