RBI MPC Meet 2024: केंद्रीय बँक RBI ने 3 ते 5 एप्रिल दरम्यान झालेल्या पतधोरण बैठकीनंतर व्याजदरांमध्ये (रेपो दर) कोणताही बदल केलेला नाही. एमपीसी समितीच्या 6 पैकी 5 सदस्यांनी पॉलिसी रेटमध्ये बदल न करण्यास सहमती दर्शवली. याचा फायदा सर्वसामान्यांना होणार असून, सर्व प्रकारच्या कर्जाच्या ईएमआयचा बोजा वाढणार नाही.
एमपीसीच्या निर्णयांची माहिती देताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी महागाईसाठी 'हत्ती' हा शब्द वापरला. ते म्हणाले, 'महागाईचा हत्ती आता जंगलात फिरायला गेला आहे.'
RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी महागाईची तुलना 'हत्ती'शी केली आहे. कारण RBI ने महागाईचे व्यवस्थापन करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि आता महागाई गेल्या काही महिन्यांत 6 टक्क्यांच्या खाली आहे.
त्यामुळे महागाई कमी झाली आहे (हत्ती जंगलात परतला आहे), तो तसाच राहिला पाहिजे (हत्ती जंगलातच राहिला पाहिजे) असे शक्तीकांत दास म्हणाले.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या माध्यमातून सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की महागाई कमी झाली आहे. अन्नधान्याच्या महागाई दरात सतत चढ-उतार होऊ शकतात, असे त्यांचे मत आहे.
आरबीआय गव्हर्नर म्हणाले, डिसेंबर 2024 मध्ये किरकोळ महागाई 4 महिन्यांच्या उच्चांकावर (5.69%) होती. यानंतर, जानेवारीमध्ये महागाई दर 5.10% होता, तर फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाई दर आणखी कमी होऊन 5.09% झाली.
RBI गव्हर्नर यांनी जाहीर केले की आर्थिक वर्ष 2025 च्या GDP वाढीच्या अंदाजात कोणताही बदल होणार नाही. केंद्रीय बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी 7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
देशातील महागाई नियंत्रित करण्यासाठी सेंट्रल बँक रेपो दरात बदल करते. रेपो दर म्हणजे मध्यवर्ती बँक इतर बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर.
जेव्हा जेव्हा महागाई जास्त होते तेव्हा अर्थव्यवस्थेतील नकारात्मक प्रवाह कमी करण्यासाठी बँक रेपो दर वाढवते. त्याच वेळी, देशाची अर्थव्यवस्था बिकट असेल, तर रेपो दरात कपात करून पैशाचा ओघ वाढवला जातो. RBI ने फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो रेट 6.5 टक्के केला होता. त्यानंतर रेपो दरात कोणताही बदल झालेला नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.