Raghuram Rajan: आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, त्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी राजकारणात यावे असे वाटत नाही. राजकारणात येण्यापेक्षा मला शक्य होईल तिथे मार्गदर्शन करायला आवडेल, असे ते म्हणाले.
"मी वारंवार सांगितले आहे की मी राजकारणात येणार नाही आणि अजूनही लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. माझे कुटुंब आणि पत्नीला वाटते की मी राजकारणात येऊ नये.'' द प्रिंटसाठी वीर संघवी यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान त्यांनी हे भाष्य केलं आहे.
राजन यांना राहुल गांधींशी असलेली जवळीक आणि ते काँग्रेसच्या माजी अध्यक्षांना ते सल्ला देतात का? असा प्रश्नही विचारण्यात आला. राजन म्हणाले की, राहुल गांधींना अनेकदा विचार करण्याची आणि नेतृत्व करण्याची क्षमता नसलेली व्यक्ती म्हणून चित्रित केले जाते. "मला वाटते की ते हुशार आणि धाडसी आहेत.''
पीएलआय योजना आणि चिप उद्योगात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक यासारख्या मोदी सरकारच्या काही धोरणांवर टीका करणारे राजन म्हणाले की, राहुल गांधींकडे सर्व उत्तरे आहेत असे त्यांना म्हणायचे नाही.
"राहुल गांधींना चित्रित केले गेले आहे त्याच्या विरुद्ध ते एक अतिशय चांगले नेते आहेत. जर तुम्ही त्यांच्याशी असहमत असाल तर तुम्हाला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल पण ते त्या चर्चेत सहभागी होण्यास पूर्णपणे तयार आहेत."
रघुराम राजन भविष्यात काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा डिसेंबर 2022 मध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सामील झाल्यापासून सुरु आहे. यात्रे दरम्यान राजन यांनी राहुल गांधींशी संवादही साधला होता. या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना भाजपचे आयटी विभाग प्रमुख अमित मालवीय म्हणाले होते की, राजन यांनी राहुल गांधींच्या यात्रेत सामील होणे आश्चर्यचकित होण्यासारखे नव्हते. "ते स्वतःला पुढचे मनमोहन सिंग समजतात.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.