Narayana Murthy: इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींनी सांगितले नफा कमावण्याचे सूत्र; म्हणाले, 'पैसा ही सर्वात...'

Infosys founder Narayana Murthy: इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी सांगितले की, कंपन्यांच्या वाढीसाठी आणि नफा मिळविण्यासाठी त्यांच्या ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि आदर मिळवणे महत्त्वाचे आहे.
Winning trust, respect from customers key for businesses to bloom says Narayana Murthy
Winning trust, respect from customers key for businesses to bloom says Narayana Murthy Sakal
Updated on

Infosys founder Narayana Murthy: इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी सांगितले की, कंपन्यांच्या वाढीसाठी आणि नफा मिळविण्यासाठी त्यांच्या ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि आदर मिळवणे महत्त्वाचे आहे. इन्फोसिसचा संदर्भ देताना ते म्हणाले की, त्यांच्या स्थापनेपासूनच त्यांच्या कंपनीचे उद्दिष्ट केवळ नफा मिळवण्याऐवजी सन्मान मिळवणे हे आहे.

मूर्ती म्हणाले की, ते आणि त्यांची टीम इन्फोसिसला भारतातील सर्वात प्रतिष्ठित कंपनी बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. नारायण मूर्ती यांच्या पाच दिवसांच्या व्हिएतनाम भेटीदरम्यान, आयटी उद्योगातील दिग्गजांनी व्हिएतनामी माहिती तंत्रज्ञान कंपनी FPT चे अध्यक्ष ट्रुओंग गिया बिन्ह यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.

ते म्हणाले की, ग्राहकांचा आदर नफ्यात रूपांतरित होतो जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल, तर कंपन्यांनी या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

Winning trust, respect from customers key for businesses to bloom says Narayana Murthy
Raghuram Rajan: 'भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल पण...', RBIचे माजी गव्हर्नर यांनी व्यक्त केली चिंता

इन्फोसिसचे संस्थापक म्हणाले की, जगभरातील अनेक यशस्वी उद्योगपती त्यांच्या कंपनीचे 75 टक्के शेअर्स कनिष्ठ अधिकाऱ्यांना देतात. इन्फोसिस देखील याचे पालन करते. ते म्हणाले की, कर्मचाऱ्यांनी स्वतः कंपनीच्या मालमत्तेचा आदर आणि संरक्षण करणे आवश्यक आहे.

कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी कंपन्यांनी अनुकूल परिस्थिती निर्माण करावी, असे मूर्ती म्हणाले. ते म्हणाले की, माझ्या मते पैसा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट नसून कर्मचाऱ्याला त्याच्या क्षमतेचा आदर आणि कौतुक हवे असते.

Winning trust, respect from customers key for businesses to bloom says Narayana Murthy
Gold Loan: आरबीआयच्या कडक नियमांमुळे गोल्ड लोन घेणाऱ्यांच्या अडचणी वाढणार; आता मिळणार कमी पैसे

विकसित देश होण्याच्या दिशेने वाटचाल

व्हिएतनामच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करताना मूर्ती म्हणाले की, देश आशियातील आघाडीच्या विकसित देशांपैकी एक बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ते म्हणाले की व्हिएतनाम आशियातील इतर देशांच्या तुलनेत आपल्या लोकांसाठी वेगाने प्रगती करेल.

भविष्यात तुमच्या वाढीबद्दल मला शंका नाही. मूर्ती यांनी व्हिएतनामचे पंतप्रधान फॅम मिन्ह चिन्ह यांचीही भेट घेतली. यावेळी चिन्ह म्हणाले की, व्हिएतनामच्या परराष्ट्र धोरणात भारताला सर्वोच्च प्राधान्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com